चंद्रपूर मनपाच्या कारवाई नंतर व्यापारी भडकले ,काही वेळ गांधी चाैकात तणावाचे वातावरण आमदार किशोर जोरगेवारांनी केली यशस्वी मध्यस्थी !

0
524

विशेष प्रतिनिधी/ किरण घाटे

चंद्रपूर :- स्थानिक गांधी चौकातील दुकानावर कारवाई केल्यामुळे व्यापारी आणि मनपाच्या कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली हाेती . यावेळी काही व्यापाऱ्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना संपर्क करत या प्रकरणाची माहिती दिली. आमदार जोरगेवार यांनी तात्काळ सदरहु ठिकाण गाठत मध्यस्थी केल्यानंतर मनपा प्रशासनाच्या वतीने कारवाई मागे घेण्यात आली. माणुसकीच्या भावनेतून काम करा व व्यापारी वर्गांशी साैजन्याने वागा अश्या सूचना देखिल यावेळी आमदार जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला दिल्यात.

आज गुरुवारला येथील गांधी चौकातील मुख्य बाजारपेठेत मनपाचे पथक कारवाई करण्यासाठी दाखल झाले. यावेळी येथील एका दुकानावर सदर पथकाने कारवाई करत दुकानाला ताला ठोकला मात्र दुकान सुरू नव्हते. दुकानाचे स्वेटर बंद करून आत हिशोब सुरू असल्याचा दावा दुकान मालकाने या वेळी केला. त्यामुळे मनपाच्या या कारवाईच्या विरोधात येथील सर्व व्यापारी एकत्र आले . परिणामी काही वेळ या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. याची माहिती काही व्यापाऱ्यांनी आमदार जोरगेवार यांना दिली. लगेच आमदार जोरगेवार घटनास्थळी दाखल झाले. यावेळीं आमदार जोरगेवार यांनी मध्यस्थी करत वाद मिटविला मनपा प्रशासनाने कोणतीही कार वाई करत असताना माणुकीचा दृष्टीकोन ठेवावा अशा सूचना यावेळी आ. जोरगेवार यांनी केल्यात. व्यापाऱ्यांची भूमिका नेहमी प्रशासनाला मदत करण्याची राहिली आहे. त्यामुळे त्यांना सन्मान जनक वागणूक दिल्या गेली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. आ. जोरगेवार यांच्या मध्यस्ती नंतर महानगरपालिका प्रशासनानेही केलेली कारवाई मागे घेतली असल्याचे समजते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here