भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे विचार देशाला दिशा देणारे : खासदार बाळू धानोरकर

0
512
भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे विचार देशाला दिशा देणारे : खासदार बाळू धानोरकर
 
शहर काँग्रेसतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी 
 
चंद्रपूर : जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना, भक्कम लोकशाही व्यवस्था भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिली असून, त्यामुळे स्वातंत्र्योत्तर ७० वर्षे भारत देश अखंड, सार्वभौम राहिला. लोकशाही दिवसेंदिवस मजबूत झाली. याचे श्रेय बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला आहे. बाबासाहेबांचे विचार आणि त्यांनी दिलेल्या संविधानातच समस्त देशवासीयांना पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे, अशा शब्दांत खासदार बाळू धानोरकर यांनी बाबासाहेबांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. तसेच करोनाचा प्रकोप पाहता  डॉ. बाबासाहेबांची जयंती घराघरातूनच साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
 आज शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यालय कस्तुरबा चौकात प्रतिमेला पुष्पहार व  मुख्य मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण अर्पण करून वंदन केले. यावेळी शहर अध्यक्ष रामू उर्फ रितेश तिवारी, युथ काँग्रेस जिल्हा अध्यक्ष हरीश कोत्तावार, जेष्ठ काँग्रेस नेते प्रवीण पडवेकर,  ओबीसी शहर अध्यक्ष नरेंद्र बोबडे, राजू रंगारी, अख्तर सिद्धीकी, संजय गंपावार, अशपाक हुसेन, मनीष तिवारी, प्रीती शहा, अश्विनी खोब्रागडे, राजू रंगारी यांची उपस्थिती होती. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन रचनात्मक कार्याने भरलेले आहे. एकता, समता, बंधुतासारखे त्यांचे मानवतावादी, सुधारणावादी विचारच सर्वाना पुढे नेतील. अशा शब्दात खासदार बाळू धानोरकर यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here