भंगाराम तळोधीतील सामाजिक कार्यकर्त्याचा अपघाती मृत्यू

0
551

भंगाराम तळोधीतील सामाजिक कार्यकर्त्याचा अपघाती मृत्यू

आक्रमकतेमुळे पिडीत कुटुंबाला मिळाली मदत

 

गोंडपिपरी- भंगाराम तळोधी येथील सामाजिक कार्यकर्ता माजी ग्राम पंचायत सदस्य संतोष ताजने यांचा दि.२ बुधवारी रात्री ८ च्या सुमारास अपघात झाला त्यात ते जबर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
तळोधी येथील संतोष ताजने हे आपल्या दुचाकीने विलास कत्रोजवार सहकाऱ्यासोबत गोंडपीपरिवरून तळोधी जात असताना चेकविठलवाड्याजवळ काम सुरू असल्याची माहिती नसल्याने गाडी घसरून पडली त्यात संतोष ताजने गंभीर जखमी झाले.लगेच त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले तिथून दि.३ गुरुवारी सेवाग्राम नेताना दुपारी ४ च्या दरम्यान संतोष ताजने यांची प्राण ज्योत मावळली. गोर गरीबांचे कामे करणारा सामाजिक कार्यकर्ता गमावल्याने गावकऱ्यांनी तळोधी येथे सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवली.घटनेची माहिती मिळताच शिवसेना उप जिल्हा प्रमुख संदीप करपे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचा प्रमुख गेल्याने त्यांच्या गरीब कुटूंबाला आर्थिक मदत मिळावी या करिता आक्रमक भूमिका घेत ते तालोधी येथे ठाण मांडून बसले.दुसऱ्या दिवशी उपजिल्हाप्रमुख संदीप करपे, माजी जी. प.सदस्य अमर बोडलावार यांच्या सोबत अनेक सामाजिक,राजकीय कार्यकर्त्यांनी कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी याकरिता पोलिस स्टेशन येथे धाव घेतली.मुल येथील उप विभागीय अधिकारी इंगळे ,ठाणेदार जीवन राजगुरू यांचेशी चर्चा करून अखेर मृतक संतोष ताजने यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून दिली.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडूरवार,शिवसेना तालुका उपप्रमुख जयेश कारपेनवार, सिनु कंदनुरीवार, संजय रामगोनवार, पेडीलवार उपस्थित होते.ताजने यांच्या पच्यात मुलगा,मुलगी,पत्नी असा परिवार असून गावात शोककळा व्यक्त केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here