ठाणेदार सत्यजित आमले यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून स्वागत

0
590

ठाणेदार सत्यजित आमले यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून स्वागत

 

कोरपना प्रतिनिधी
एकीकडे ‘अजान’ चे नावावर एक दुसऱ्या धर्मा विषयी चुकीचा संदेश देणे सुरू आहे. मात्र दुसरी कडे सामाजिक बांधिलकी ठाणेदार सत्यजित आमले जोपासताना दिसत आहेत.

आधी हनुमान जयंती निमित्त पोलिस ठाण्यात महाप्रसादाचे आयोजन केले तर आता शहरातील सर्व मस्जिद मध्ये रोज अफतारी साठी फळ घेऊन आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन ठाणेदार मस्जिद मध्ये पोहचत आहे. आधी गांधी चौकातील रजा मस्जिद येथे तर दुसऱ्या दिवशी मदिना मस्जिद मधे तर तिसऱ्या दिवशी महंमदिया मस्जिद येथे रोजा असलेल्यांना केळी, टरबूज, सेफ, अंगुर, खजुर अशी विविध प्रकारची फळे घेऊन ठाणेदार सत्यजित आमले आले.

सहकारी सुनील बोरीकर, प्रशांत शेडे, धर्मराज मुंडे, पोलिस गाईड विजय दहीवलकर हे पोहचत असून नागरिकात त्याचे कौतुक केल्या जात आहे. यावेळी रजा मस्जिद येथे मस्जिद चे हाफिज हसनैन रजा, मौलाना अब्दुल सत्तार, इलियास किडिया, तर मदिना मस्जिद येथील हाफिज साहाब, हाजी जुबेर यांनी ठणेदाराचे स्वागत केले. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून सर्व समाजात कौतुक केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here