कोरपना येथे नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

0
558

कोरपना येथे नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

 

कोरपना – श्रीराम सेवा समिती कोरपना तर्फे नगरपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भारत चने, माजी नगरसेवक अमोल आसेकर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पिंपळशेंडे , गंगाधरजी गिरडकर, पुंडलिक गिरसावळे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले.नगर पंचायत स्थापनेनंतर च्या दुसऱ्या निवडणुकीत निवडून आलेले नगरसेवक नंदाताई बावणे, गीता डोहे, मनीषा लोडे, देविका पधरे, जोशना खोबरकर,राधिका मडावी , वर्षा लांडगे, सविता तुमराम, आशा झाडे, शेख आरिफा रमजान, मनोहर चने, नितीन बावणे, इस्माईल शेख,निसार शेख, शेख मोहमद, सुभाष हरबडे, लक्ष्मण पंधरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश गज्जलवार, संचालन उमेश पालीवाल तर आभार श्रीकांत लोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मीनाथ महाराज पेटकर, दिनेश राठोड, मनोहर किनाके, पांडुरंग वरभे, महेंद्र कोमावार, विश्वेश्वर गंगशेट्टीवांर, विजय गिरडकर, ऋषी जोगी , गजानन कोलुरवार, राकेश कोरे, अमोल लोडे, अंशुल पोतणूरवार, राहुल कोरे आदींनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here