कोंबडबाजार भरणार आहे हो….. ही आहे तारीख आणि हे आहे ठिकाण  ‘व्हॉट्स ॲप वर अवैध धंद्याची खुलेआम जाहिरात’

0
533

कोंबडबाजार भरणार आहे हो….. ही आहे तारीख आणि हे आहे ठिकाण  ‘व्हॉट्स ॲप वर अवैध धंद्याची खुलेआम जाहिरात’

राजुरा परिसर होतोय अवैध धंद्यांचे आश्रयस्थान – पोलिसांचे अर्थपुर्ण दुर्लक्ष

 

 

कुठलाही व्यवसाय अवैध किंवा बेकायदेशीर व्यवसाय असला तर तो व्यवसाय करणारा कुणालाही आपल्या व्यवसायाची खबर लागणार नाही केवळ संबंधित लोकांनाच सामील करून आपला व्यवसाय करत असतो मात्र जर त्याला कायद्याच्या रक्षकांचे पुरेपूर पाठबळ मिळत असेल तर मात्र त्याची हिंमत वाढत जाते त्यातल्यात्यात अर्थपुर्ण संरक्षण प्राप्त झाले असेल तर तो व्यक्ती आपला व्यवसाय खुलेआम करतो प्रसंगी त्याची विविध माध्यमातून जाहिरात सुद्धा करतो मात्र ही जाहिरात सांकेतिक असते.

 

 

राजुरा परिसरात मात्र अवैध व्यवसाय कराऱ्याचे पाळेमुळे इतक्या खोलवर रुजल्या गेले आहेत की आपले कुणी काही वाकडे करू शकणार नाही ह्या तोऱ्यात सदर व्यावसायिक आपल्या अवैध व्यवसायाची जाहिरात समाज माध्यमांवर व्हिडिओ च्या माध्यमातून करत असुन कुणालाही काहीही भीती नाही बिनधास्त या आणि ह्या खेळाचा आस्वाद घ्या अशा प्रकारचे आवाहन सदर व्हिडिओ मधे करण्यात आले असून काही दिवसांपूर्वी भरविण्यात आलेल्या किंबड बाजाराचे व्हिडिओ खुलेआम समाजमाध्यमात पसरविण्यात आले असुनही राजुरा पोलिसांची सदर प्रकरणाकडे अर्थपुर्ण डोळेझाक सुरू असल्याची जोरदार चर्चा असुन कुंपणच शेत खात असेल तर बघायचे कुणीकडे असा प्रश्न उपस्थित होत आहे.राजुरा तालुका सध्या अवैध व्यवसायांचे आश्रयस्थान होत असुन तालुक्यात दोन पोलीस ठाणे आहेत मात्र दोन्ही ठाण्यांच्या हद्दीत अवैध व्यवसाय चांगलाच फोफावला असुन पोलिसांच्या अर्थपुर्ण पाठबळाशिवाय खुलेआम अवैध व्यवसाय फोफावणे शक्यच नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तालुक्यात अवैध दारू विक्री अजुनही सुरूच असून दारूबंदी दूर झाल्यावर तरी हा प्रकार बंद होईल अशी अपेक्षा होती मात्र अजूनही खेड्यातच नव्हे तर चक्क तालुका मुख्यालय असलेल्या राजुरा शहरातही अवैध दारूविक्री बिनदिक्कतपणे सुरू आहे. तालुक्यातून गोवंशाची तस्करी बिनबोभाटपणे होत असते त्यातच आता जुगार, सट्टा व कोंबड बाजाराची भर पडली असुन नागरिक त्रस्त झाले आहे.काही दिवसांपूर्वी विरुर स्टेशन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरुर रोड येथे चक्क अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी स्वतः धाड घालुन जवळपास 17 लाखांचा जुगार व 85 जुगारी ताब्यात घेतले मात्र स्थानिक पोलिसांना ह्या जुगाराची माहिती नसणे संशयास्पद ठरते. असाच प्रकार राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व पोलीस ठाण्यापासुन अवघ्या 5 किलोमीटरच्या आत अवैध कोंबडा बाजार भरविण्यात येत असून त्याची व्हिडिओ जाहिरात चक्क समाज माध्यमातून केल्या जात असुनही राजुरा पोलिसांची सदर प्रकरणाकडे होणारी डोळेझाक अर्थपुर्ण असल्याचे स्पष्ट होते.

 

सदर कोंबड बाजार भरवणारा व्यक्ती हा स्वतः परप्रांतातून लढाऊ जातीचे कोंबडे विकण्याचा व्यवसाय करत असून तोच कोंबड बाजार सुद्धा चालवत असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. मागील काही दिवसात ह्या व्यक्तीने दोन वेळा कोंबड बाजार भरवला असुन त्यात जिल्ह्यातील विविध तालुक्यातील तसेच शेजारील तेलंगणा राज्यातून देखील जुगार शौकीन कोंबड्यावर डाव लावायला येऊन गेल्याची माहिती असुन ह्या दोन्ही वेळा लाखोंची उलाढाल झाली असल्याची जोरदार चर्चा आहे. पहिल्या कोंबड बाजाराचा व्हिडिओ समाज माध्यमात प्रसिद्ध करून दुसऱ्या बाजाराची जाहिरात करण्यात आल्याने दुसऱ्या खेपेला बाजार हाऊसफुल्ल झाल्याचे कळले मात्र तरीही राजुरा पोलिसांना घटनेची माहिती नसणे आश्चर्यकारक असुन ह्या प्रकरणात पोलिसांचे अर्थपुर्ण हितसंबंध दडले असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here