अज्ञात भरधाव ट्रकने दोन म्हसींना चिरडले

0
426

अज्ञात भरधाव ट्रकने दोन म्हसींना चिरडले

एका म्हसीचा जागीच मृत्यू तर दुसरी गंभीर जखमी

राजुरा-गोवरी मार्गावर जनावरांच्या अपघातात वाढ चिंतनीय

काल भरधाव ट्रकने बैलांना दिली होती धडक त्यात दोन बैल झाले होते गंभीर जखमी

 

राजुरा – घराकडे म्हसींचा कळप येत असताना भरधाव ट्रकने दोन म्हसींना जबर धडक दिली. यात एका म्हसीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी झाली. राजुरा तालुक्यातील माथरा येथील शेतकरी रामदास सीताराम चहारे यांच्या मालकीच्या एका म्हसीचा जागीच मृत्यू झाला तर तुकाराम सीताराम चहारे यांची म्हस गंभीररीत्या जखमी झाली. यात दोनही भावांच्या म्हसींचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास माथरा गोवरी मार्गावर घडली.

 

राजुरा-गोवरी मार्गावर सकाळच्या सुमारास भरधाव ट्रकने दोन बैलांना धडक दिल्यानंतर त्याच दिवशी रात्री ९ वाजताच्या सुमारास गोवरीकडे जाणाऱ्या अज्ञात ट्रकने दोन म्हसींना जबर धडक दिली. यात एका म्हसीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी गंभीररित्या जखमी झाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. दोन्ही दुभती महागडी जनावरे असल्याने दूध विकून शेतकरी संसाराचा गाडा चालवीत होते मात्र अचानक दुभत्या जनावरांचा अपघात झाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. राजुरा-गोवरी-पोवनी मार्गावर कोळसा वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने या मार्गावर अपघातात वाढ झाली आहे. याकडे सबंधित विभागाने लक्ष देऊन कोळसा वाहतुकीवर प्रतिबंध घालावा मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here