महागाई वरती आळा घाला व सर्वसामान्यांना न्याय द्या ! राज्याचे मुख्यमंत्र्यांना गणेश वाघमारेंचे निवेदन !

0
563

उस्मानाबाद मराठवाडा -किरण घाटे विशेष प्रतिनिधी – सध्या देशासह राज्यात महाभयानक कोरोना जैविक विषाणु संसर्गाचे संकट असुन इतर रोगाचीही उत्त्पत्ती होत अाहे .काेराेनामुळे सर्वांच्या मनात भिती निर्माण झाली आहे शासन व प्रशासन काेराेनाला आटाेक्यात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे, अश्यातच महागाईने माेठा उच्चांक गाठला आहे, खाद्य पदार्थ सह इतर आवश्यक वस्तुच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, कामगार वर्गाची परिस्थिती लाॅकडाँऊन मुळे मरणावस्थेत झाली असून जगावे कसे हा मोठा प्रश्न त्यांचे समाेर निर्माण झाला आहे,

आरोग्याचा विचार करावा का रोजगारीचा.?अशी द्विधा अवस्था सध्या त्यांची झाली आहे, रोजगार असेल तर सर्व काही आहे, परंतु रोजगारच नाही तर जगायचे कसे.? मुलांच्या गरजा,

आजाराचा खर्च,विज बिल, पाणी,घरपट्टी, मुलभूत गरजा अशा परिस्थितीत भागवायच्या कशा.?कोरोनाने मरणे सोपे झाले असून जगणे अवघड झाले आहे, शासनाने कामगार, रिक्षावाले, निराधार व इतरांना मदत जाहीर केली काहींचा अपवाद वगळता इतरांना मदत मिळाली नाही, राज्य, देश लाॅकडाऊन असतांना वस्तुच्या किंमती वाढल्या कशा.? हा जरी अज्ञाणी प्रश्र्न असला तरी सर्व सामान्यांना सतावणारा प्रश्न आहे हे मात्र खरे आहे .,गेल्या वर्षी पासुन देशात कोरोना जैविक विषाणुचा प्रार्दुभाव असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे,या बाबी केंद्र सरकारकडे जरी माेडत असल्या तरी आपण एका राज्याचे मुख्यमंत्री म्हणुन आपल्याही हातात काही तरी आहेच,कोरोना जैविक विषाणु व इतर संसर्गाच्या महासंकटात नागरिक भयभीत असुन वाढत्या महागाईमुळे तर मरणावस्थेत जगत आहेत,या महागाई वर आळा आणण्यासाठी प्रयत्न करुन सर्व सामान्यांना जगण्यासाठी न्याय द्यावा,अश्या प्रकारची मागणी उस्मानाबादचे सामाजिक कार्यकर्ता गणेश रानबा वाघमारे यांनी लेखी निवेदनातुन ( ई-मेल द्वारे )मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या कडे काल केली असुन त्याची एक प्रत उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभजी दिवेगावकर यांनाही ( ई-मेल द्वारे) पाठविली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here