गडचांदूर राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे “हाथरस” प्रकरणाचा निषेध

0
214

गडचांदूर राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे “हाथरस” प्रकरणाचा निषेध

पंतप्रधान व युपीच्या मुख्यमंत्र्यांना पाठवले निषेध पत्र

घटनेविरुद्ध सर्वत्र संताप, आरोपींना फाशीची मागणी

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

गडचांदूर : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. सदर घटना अतिशय दुर्दैवी व संतापजनक असून याच्या विरूद्ध सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. इतर ठिकाणांसह गडचांदूर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सुद्धा सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला असून देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी तसेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवून जाहीर निषेध नोंदविण्यात आला आहे. या हत्याकांडात सहभागी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. गडचांदूर राकाँ महिला शहर कार्याध्यक्ष तथा नगरसेविका सौ.अश्विनी कांबळे,नगरसेविका तथा गटनेत्या सौ.कल्पना निमजे, नगरसेविका सौ.मिनाक्षी एकरे यांच्यासह इतर महिला कार्यकर्त्यांकडून पत्र पाठविण्यात आले आहे.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here