विरुर पोलीस स्टेशन हद्दीत प्रोव्हीरेड दरम्यान गावठी व विदेशी दारु साठ्यासह सात लाख एकेविस हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

0
1431

विरुर पोलीस स्टेशन हद्दीत प्रोव्हीरेड दरम्यान गावठी व विदेशी दारु साठ्यासह सात लाख एकेविस हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांच्या मार्गदर्शनात धडक प्रोव्हीरेड मोहीम

पाच गुन्हे नोंद करून सहा आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल

राजुरा (विरुर स्टे.), अमोल राऊत (२७ एप्रिल) : आज पोलीस अधीक्षक चंद्रपूर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली विरुर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विरोधात विशेष धडक मोहीम राबवित पाच गुन्हे गोंदवून सहा आरोपींवर गुन्हे नोंद करण्यात आले. या प्रोव्हीरेड दरम्यान गावठी व विदेशी दारु साठ्यासह सात लाख एकेविस हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विरुर पोलीस स्टेशन ठाणे हद्दीत अवैध दारूचा महापूर ओसंडून वाहत होता. यावर धडक मोहीम राबवित उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांनी कारवाई केल्याने अवैध दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय राजुरा व विरुर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त प्रोव्हीरेड दरम्यान नाकाबंदी करून विरुर स्टेशन रेल्वे फाटकाजवळ वरणा कार क्र. एम एच ३४ के ५९९७ या वाहनातून विदेशी दारूच्या २४० निपा (रु. २८८००) कार (किंमत ११००००) असा एकूण एक लाख अडतीस हजार आठशे रुपये मुद्देमाल जप्त करण्यात असून आरोपी गुरूदीपसिंग तकतसिंग टाक (विरुर स्टे.) विरुद्ध महादाका कलम ६५ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई विरुरचे ठाणेदार सपोनि तिवारी, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय राजुराचे पोलीस हवालदार त्रिलोकवार, पोलीस शिपाई नारायण, मनोज, इंगोले यांनी केली.
तसेच धानोरा वरून सिंधी जाणाऱ्या मार्गावर नाकाबंदी करून स्विफ्ट डिझायर कार (एम एच २४ ए ए २३६४) मधून ५३४०० रुपयांचा विदेशी दारूसाठा व कार किंमत पाच लाख रुपये असा एकूण ५ लाख ५३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत विरुर स्टेशन येथील विनोद बाबुराव इग्रपवार व जमिरशेख हैदरशेख या दोन आरोपीविरुद्ध विरुर पोलीस स्टेशन येथे कलम ६५ अ ८३ महादाका अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कविटपेठ बंजारागुडा येथे शेतातून १०० लिटर गावठी दारू सडवा प्रति लिटर १०० रुपये प्रमाणे १० हजार रुपयेचा सडवा जागेवरच नष्ट करण्यात आला असून महिला आरोपी कविता खिरु चव्हाण विरोधात कलम ६५ फ महादाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच मुंडीगेट येथे हातभट्टीवरील २० लिटर गावठी दारू, सडवा ५० लिटर व साहित्य असा एकूण ९५०० रुपयेचा मुद्देमाल ताब्यात घेऊन महिला आरोपी प्रेमीला भद्रु राठोड विरोधात कलम ६५ ब,फ,क महादाका अन्वये गुन्हा दाखल केला. सिंधी येथील प्रभाकर किसन दुर्गे यांच्या ताब्यातून ५० लिटर गावठी दारू (किंमत १०००० रु.) जप्त करून आरोपीवर ६५ ई महादाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई विरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वडतकर, सह पोहवा दिवाकर पवार, पोहवा माणिक वाग्दरकर, पोशी प्रमोद मिलमिले, पोशी अशोक मडावी, पोशी सुरेंद्र काळे, पोशी अतुल शहारे, मपोशी प्रियंका राठोड यांनी विरुर पोलीस स्टेशन हद्दीत प्रोव्हीरेड दरम्यान केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here