जिवती शहरातील चिखलमय रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !
● वाहन धारकांना करावी लागतेय नाहक तारेवरची कसरत
● रस्त्यात चिखल की चिखलात रस्ता कळता-कळेना
● तरीही झोपेचे सोंग घेतलेल्या बांधकाम विभागाचे लक्ष वळता-वळेना
बातमीदार । गोविंद वाघमारे impact24news
जिवती | गेल्या दोन महिन्या पासून दडी मारलेल्या पावसाने जूनच्या तिसऱ्या आठवड्यात हजेरी लावली. आणि जिवती शहरातील रस्त्याचे अंतरंग उघडे पडले, प्रशासनाने पावसा अगोदरच रस्त्याची दुरुस्ती करायला पाहिजे होती. पण तसे न करता फक्त बघ्याची भूमिका पार पाडली. परंतु रिमझिम पाऊस येताच शहरातील विविध भागांतील डांबरी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहन धारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. त्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत.रिमझिम पावसात ही स्थिती निर्माण झाली आहे तर जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यास काय होईल ? याची चिंता येथील वाहन धारकांना पडली आहे, जिवती शहर परिसरात अवघ्या दोन आठवड्यात ठराविक अंतराने पावसाने हजेरी लावली, त्यामुळे रस्त्याची दैनावस्था निर्माण झाली आहे. नागरपालिकेने नेहमी निर्माण होणारे संकट लक्षात घेऊन मान्सूनपूर्व कामांच्या नावाखाली अनेक रस्त्याची तात्पुरत्या स्वरूपात का होईना डागडुजी करायला पाहिजे होती. पण त्या कडे सर्रास दूर्लक्ष केले. उन्हाळ्यात शहरात विकास कामाच्या नावाखाली अनेक रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते. पण खोदकाम झाल्यावर त्याचे मजबुती करन करणे गरजेचे होते. पण केले नाही ,परिणामी अनेक भाग रिमझिम पावसाने चिखलमय झाले आहेत.
शहरातील रामनगर ते तहसील कार्यालय हा मुख्य रस्ता तर दिसेनासा झालाय ठिक-ठिकाणी चक्क मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्याची खोली इतकी आहे की रात्रीच्या वेळी वाहन धारकांना रस्ताच लक्षात येत नाही. या रस्त्यावरून ये – जा करताना काही वाहनधारक पडले आहेत, रस्त्याची ही अवस्था अपघातास घातक असल्याची तक्रार वाहनधारक करत आहेत.
मागील वर्षी पावसाळ्यात खड्यामुळे अपघात होऊन काही वाहनधारकांचा जीव गेला आहे, यंदा तसा काही प्रकार घडतो की काय ? अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सतत पडणाऱ्या पावसामुळे डबक्यात पाणी साचून राहते. त्यामुळे वाहन धारकांना तसेच पादचाऱ्यांना खड्डयामुळे बऱ्याचदा अपघात संभावतो, खड्डेमय रस्त्यावरून वाहने चालविल्याने अनेकांना चिखलमय रस्त्याचा सामना करावा लागत आहे. ही अतिशय वाईट बाब असून याकडे झोपलेले संबंधीत बांधकाम विभाग डोळेझाक करीत असून लोकप्रतिनिधी सुद्धा मुंग गिळल्या सारखे गप्प आहेत. या मुळे नागरिकांत प्रशासन व लोकप्रतिनिधी विरोधात मोठी संतापाची लाट निर्माण झाली आहे.याची गंभीर दखल प्रशासनाने त्वरीत घेऊन ताबडतोब जिवती शहराला चिखलमुक्त करावे अशी मागणी नागरिकांत जोर धरत आहे.