केंद्र सरकारच्या आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अथक प्रयत्नाने देशांमध्ये आज कोरोना जीवघेण्या रोगावरील लसीकरणाला देशात प्रारंभ

0
493

अनंता वायसे हिंगणघाट तालुका प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अथक प्रयत्नाने देशांमध्ये आज कोरोना जीवघेण्या रोगावरील लसीकरणाला देशात प्रारंभ झाला  आहे

आज दिनांक 16- जानेवारी 2021 ला हिंगणघाट विधान सभेचा शुभारंभ उप-जिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे दिनांक 16- 01- 2021 ला मा. कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या शुभ हस्ते कोरोणा रोगावरील लशिकरणाचा शुभारंभ करण्यात आला..
हिंगणघाट उप-जिल्हा रुग्णालयां मध्ये 1100 कोरोना योधांना लसीकरण होणार असून याची आज सुरुवात झाली. त्यापैकी आज 100 रूग्णांना लसीकरण होणार असून उप- जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर चाचारकर साहेब यांच्यापासून लसीकरणाची सुरुवात झाली.
या जीवघेण्या कोरोना रोगावरील लसीकरणाच्या शुभारंभ करते वेळी हिंगणघाट नगराचे लोकप्रिय व लोकनिर्वाचित नगराध्यक्ष प्रेमबाबु बसंताणी, उप-जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी डॉक्टर माधुरीताई कुचेवार, नगरसेविका सौ. रवीलाताई शिवाजी आखाडे तसेच उप-जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, सेविका व इतर सर्व कर्मचारी व कोरणा बाधित रुग्ण सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here