निराधारांना कधी देणार हो आधार,मागील नऊ महिन्यांपासून मानधन नाही.
सुखसागर झाडे

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने निराधारांना मासिक १हजार ते १हजार २०० रु. अर्थसाहाय्य अनुदान स्वरूपात दिले जाते.
चामोर्शी तालुक्यातील जवळपास १५ हजार ३७४ नागरिक शासनाच्या या योजनेचा लाभ घेतात. परंतु फेब्रुवारी महिन्यापासून मासिक अनुदान मिळाले नाही. त्यामुळे संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना अशा सर्व लाभार्थी नागरिक बॅंकेत अधुन- मधून रांगेत उभे राहून भर उन्हातान्हात शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. लाकडाऊनच्या कालावधीत मानधन न मिळाल्याने निराधारांचे हाल झाले आहे. त्यांना विविध आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.