आम आदमी पार्टी युवा आघाड़ी कडून महाविनाश आघाड़ी चा निषेध ….!

0
388

आम आदमी पार्टी युवा आघाड़ी कडून महाविनाश आघाड़ी चा निषेध ….!

विद्यार्थ्यांना झालेल्या आर्थिक व मानसिक नुकसानीस जवाबदार कोण? – राजेश चेडगुलवार

महाविकास आघाड़ी कडून घेण्यात येणाऱ्या आरोग्य भर्ती ग्रुप क आणि ग्रुप ड परीक्षा पूर्व सूचना न देता परिक्षेच्या 10 तास आधी रदद् करून पुढे ढकलल्या मुळे निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

आधीच खुप उशिरा काढण्यात आलेली ही आरोग्य भर्ती असून त्यात विद्यार्थ्याना हॉल तिकीट 4 दिवसा आधी उपलब्ध करण्यात येत आहे व त्यात कोणाला नोयडा उत्तरप्रदेश तर कोणाला चीन ला सेंटर देण्यात आले. विद्यार्थी यांच्या नावाच्या ऐवजी वडिलांचे नाव व वडिलांच्या नावाच्या ऐवजी त्यांचे नाव तर सेंटर नाव आहे पन जिल्हा नाही असे अनेक भोंगळ कारभार या आरोग्य विभागाने समोर आणून ठेवल्या मुळे परीक्षा पुढे ढकलली आहे. यांची यंत्रणा योग्य नाही काम ढिसाळ आहे त्यामुळे हे स्पष्ट झाले आहे.

 

 

अनेकांना बाहेर गावचे सेंटर मिळाले विद्यार्थी परिक्षेच्या आदल्या रात्रि पोहचले व काही प्रवासात असताना त्यांना कळले की परीक्षा पुढे ढकलली तर त्यांना होणाऱ्या आर्थिक व मानसिक नुकसानीस कोन जबाबदार? असा प्रश्न श्री राजेश चेडगुलवार यांनी उपस्थित केला आहे. आम आदमी पार्टी युवा आघाड़ी च्या काही मागण्या खालील प्रमाणे असून महाविकास (महाविनाश) सरकार ने विद्यार्थ्यांना तात्काळ न्याय द्यावा ही विनंती.

■■■ प्रमुख मागण्या ■■■

● आरोग्य भर्ती परीक्षा देणाऱ्यांचा 8 लाख विद्यार्थी यांचा छळ थांबवावा.

● आरोग्य विभाग परिक्षेला बाहेर गावा वरुन आलेल्या विद्यार्थ्यांचा खर्च परत करण्यात यावा.

● पुढील परीक्षा 15 दिवसाच्या आत योग्य नियोजन करून घेण्यात यावी.

● पुढल्या परिक्षेला जान्या येन्याचा खर्च शाशनाने उचलावा.

● आरोग्य विभागाने आपला भोंगळ कारभार तातडीने थांबवत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा.

 

 

 

या निषेध कार्यक्रमाला सुनील देवराव मुसळे युवा जिल्हाध्यक्ष, मयुर राईकवार सोशल मीडीया प्रमुख राजेश चेडगुलवार, सूनिल भोयर महानगर संघटन मंत्री व इंचार्ज, भिवराज सोनी जिल्हा कोषाध्यक्ष, संतोष दोरखंडे जिल्हा सचिव, योगेश आपटे उपाध्यक्ष, राजू कुडे सचिव, सीकंदर सागोरे, अजय डुकरे, चंदू माडुरवार, मुकेश वरारकर युवा अध्यक्ष महानगर, जेष्ठ कार्यकर्ता वामनराव नंदूरकर, जेष्ठ कार्यकर्ते मधुकरराव साखरकर, देवकी देशकर, निखील बारसागडे, अमोल बलकी, दिलीप तेलंग, सुजित चेडगुलवार, अश्रफ भाई इत्यादी अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here