सोन्याची लंका दिवाळखोरीत…. महागाईचा मोठा भडका … आणीबाणी लागू….

0
572

सोन्याची लंका दिवाळखोरीत…. महागाईचा मोठा भडका… आणीबाणी लागू….

अहमदनगर
संगमनेर… १३/१/२०२२
प्रतिनिधी ज्ञानेश्वर गायकर पाटील यांस कडून…

विशेष वृत्त….
भारत देशाच्या शेजारील तमिळ राष्ट्र श्रीलंका दिवाळखोरी च्या उंबरठयावर पाऊल टाकत असून, डिसेंबर मध्ये चक्क २२% महागाई चा कळस या देशाने गाठला आहे.
श्रीलंकेत रोजच्या भाज्यांचे दर गगनाला भिडले असून , हिरवी मिरची ७००₹ किलो, बटाटे २००₹ किलो तर घरगुती गॅस मध्ये सुमारे ९० %वाढ झाली आहे. वांगी 200रुपये किलो , कारली ३५०तर अन्य कोणतीही भाजी २०० ₹ पेक्षा जास्त भावात मिळत आहे.दूध तर चारशे पेक्षा जास्त बाजार भावात मिळत असल्याने , सर्व सामान्य माणूस कष्टी आहे.
किराणा मालाचे ही भाजार भाव या पेक्षा वेगळे नसल्याने  श्रीलंकेत आर्थिक स्थिती पूर्ण ढासळली असून सरकार ने विशेष आणीबाणी जाहीर केली आहे. सर्व सामान्य माणूस पोटाला चिमटा काढून अर्ध पोटी राहत असून, जागतिक पातळीवर याची दखल घेण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here