प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात भाजपला धक्का, 13 पंचायत समितीत एकही सभापती नाही

363

प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात भाजपला धक्का, 13 पंचायत समितीत एकही सभापती नाही

 

अहमदनगर
संगमनेर १७/१०/२०२२
ज्ञानेश्वर गायकर पाटील
“भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिल्ह्यात पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपची मोठी हार”. महा विकास आघाडीला उमेदवार ही मिळवून देणार नाहीत अशी पोकळ गर्जना करणारे बावनकुळे ,पुन्हा एकदा भाजपचे वाचाळवीर ठरले आहेत, अशी टीका ही नाना पटोले यांनी केली आहे.भारतीय जनता पक्षाला शिंदे गटाची युती महाग पडत चालली असून, महा विकास आघाडीचे पारडे राज्यात मजबूत होताना दिसत आहे.अंधेरीचा निकाल ही महा विकास आघाडीच्या बाजूने लागेल ,असे वक्तव्य राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

नागपूर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पंचायत समिती सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. नागपूर जिल्ह्यातील 13 ही तालुक्यांमध्ये भाजपला एकही पंचायत समितीवर सभापती होऊ शकला नाही. फक्त दोन तालुक्यात उपसभापती पदावर भाजपला समाधान मानावे लागले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिल्ह्यात पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपची पाटी कोरी राहिली आहे. तर दुसरीकडे संख्याबळाच्या आधारावर काँग्रेसला व राष्ट्रवादीला मोठ यश मिळाले आहे.वास्तविक पंचायत समित्या ह्या विकासाच्या तसेच पुढील राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र मानले जाते. महा विकास आघाडीने सदस्य संख्येत मोठी बाजी मारली होती. जनतेला शिंदे भाजप युती मान्य नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यात सरपंच निवडीत ही महा विकास आघाडीने बाजी मारली आहे. भारतीय जनता पक्षाने आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असून ,गलिच्छ राजकारण करू नये, याचे गंभीर परिणाम भविष्यात राज्यात उमटत रहितील असे सूचक वक्तव्य नुकेतेच खासदार सुप्रिया सुळे यांनी ही केले होते.

13 पंचायत समितींपैकी 9 पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे सभापती
जिल्ह्यातील 13 पंचायत समितींपैकी 9 पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे सभापती निवडून आले आहे. तर तीन तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती झाला आहे. तर एका तालुक्यात शिंदे गटाचा अनेक्षिपित सभापती झाला आहे. पंचायत समितीमध्ये सभापती, उपसभापती निवडणुकांसाठी भाजपतर्फे अनेक कॉंग्रेसच्या नेत्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर राष्ट्रवादीचेही काही नेते संपर्कात होते. मात्र भाजप ची यात कोंडी करण्यात महा विकास आघाडीला यश आले आहे.

‘या’ पंचायत समित्यांवर कॉंग्रेस राज
कॉंग्रेसला सभापतीपद मिळालेल्या पंचायत समित्यांमध्ये जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण, कामठी, सावनेर, कळमेश्वर पारशिवनी, उमरेड, मौदा, कुही, भिवापूर या पंचायत समितींचा सामवेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती झालेली पंचायत समित्यांमध्ये नरखेड, काटोल व हिंगणा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस विजय मिळवला आहे. तर शिवसेनेच्या शिंदे गटाला रामटेक पंचायत समितीत सभापती पद मिळाले आहे. यासोबतच रामटेक आणि मौदा तालुक्यात भाजपला उपसभापती पद मिळाले आहे. काटोल नरखेड पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राखले.

काल झालेल्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये काटोल व नरखेड येथील पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती विजयी झाले आहेत. यात नरखेड पंचायत समितीमध्ये महेंद्र गजबे हे सभापतीपदी बिनविरोध तर उपसभापती पदी माया प्रवीण मुढोरिया 6 विरुद्ध 2 मतांनी विजय झाले. तर काटोल पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय डांगोरे हे सभापती तर उपसभापतीपदी निशिकांत नागमोते हे बिनविरोध निवडून आले आहेत.

dmgaykar@gmail.com

advt