आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी अगस्ती सहकारी साखर कारखाना घेणार आदिवासी भागातून २ लाख टन ऊस उत्पादन….. – सीताराम पाटील गायकर

0
629

आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी अगस्ती सहकारी साखर कारखाना घेणार आदिवासी भागातून २ लाख टन ऊस उत्पादन….. – सीताराम पाटील गायकर

 

 

अहमदनगर संगमनेर दिनांक ७/१०/२०२२ (ज्ञानेश्वर गायकर प्रतिनिधी) अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका हा प्रामुख्याने आदिवासी भाग असलेला तालुका आहे, अकोले तालुक्याचे मूळ निवासी अद्याप ही विकासा पासून वंचित आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असून त्या करिता वाटेल ते कष्ट पडले तरी चालतील ,पण यांचे जीवनमान उंचावण्यासाठी , अगस्ती सहकारी साखर कारखाना दोन लाख टन उसाचे उत्पादन घेईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा अगस्ती चे चेअरमन श्री सीताराम गायकर पाटील यांनी काल भंडारदरा शेंडी येथे आयोजित सत्कार कार्यक्रमात केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर किरण लहामटे होते. अगस्ती चे सर्व नूतन संचालक सह ॲड वसंत मनकर , कॉम कारभारी उगले , मातोश्री भांगरे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांगरे , मारुती मेंगाळ,दिलीप भांगरे, बाळासाहेब यादव, अरुण माळवे ,भाऊसाहेब यादव, शरद कोंडार ,किसनराव हांडे, १९ गावचे नवं निर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत प्रतिनिधी , जिल्हा बँक संचालक अमित भांगरे आदी उपस्थित होते.

शेंडी भंडारदरा गावातून सर्व विजयी उमेदवारांची मोठी मिरवणूक काढण्यात आली. जनतेचा व आदिवासी समाजाचा मोठा सहभाग या मिरवणुकीत होता, रस्त्याचा दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जागोजागी सुमारे दोनशे महिलांनी या वेळी सीताराम गायकर व अशोक भांगरे यांचे औक्षण ही केले. देशात गाजलेले आदिवासी महिलांचे आदिवासी नृत्य चा ठेका उपस्तीताचे लक्ष वेधून घेत होता.

अगस्ती चे अध्यक्ष सीताराम गायकर पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले की, अगस्ती आम्ही सक्षमपणे चालवू दाखवणार असून महाराष्ट्राचे नेते अजितदादा पवार यांचे अनमोल मार्गदर्शन व योगदान भविष्यात या करखण्यास लाभणार आहे. कारखाना ची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी स्थानिक ऊस उत्पादन वाढवणे गरजेचे आहे , त्या करिता आदिवासी बाहू भागात कोल्हापूर पॅटर्न कसा राबवता येईल या बाबत सर्वेक्षण चालू केले असून,त्या बाबत कार्यवाही चालू आहे, जुन्या बंद पडलेल्या पाणी योजना चालू करण्या करिता मी , अमित भांगरे, मधुकर नवले आवश्यक ती मदत करू असा शब्द ही त्यांनी अशोक भांगरे यांना दिला. जिल्हा बँक मार्फत कोणत्याच निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही ही त्यांनी दिली. शरद पवार साहेब व अजितदादा यांचे त्यांनी विशेष आभार मानले .

अध्यक्ष पदावरून बोलताना आमदार किरण लहामटे यांनी सांगितले की अकोला तालुक्यात सकारात्मक बदल घडत असून देशाचे नेते शरद पवार, अजित दादा पवार यांनी अकोल्याची भूमी चाळीस वर्षे सुजलाम् सुफलाम् केली ,पण ह्या भूमीतील एक ही घटक एका व्यक्तीने जाणीव पूर्वक हुशार होऊन दिला नाही अशी बोचरी टीका पिचड यांचे नाव न घेता त्यांनी केली. अकोल्यात घडणारे बदल ही बदलत्या संपन्न तेची चांगली पाऊले व नंदी आहे. ज्या आदिवासी समाजाला पवार साहेबांनी खूप दिलं तो माझा आदिवासी समाज पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कायम राहणार असल्याचे त्यांनी सूतोवाच केले. अशोक भांगरे यांनी पिचड घरण्याबरोबर केलेला संघर्षाची मोठी यादीच आपल्या भाषणात साजर केली.पिचड यांचा पराभव करणे हे स्वप्न होते , ते पूर्ण तुम्ही मला सर्वांनी मदत केली ,त्या बद्दल मी ऋणी असल्याचे ही भांगरे म्हणाले. ऊस उत्पादन वाढीचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल त्याची सुरवात माझ्या पासून होईल , तशी घोषणा ही मिनानाथ पांडे यांनी केलीच आहे.माझा नाही तर सर्व गावात भविष्यात ऊस दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या वेळी स्थानिक आदिवासी नेते विठ्ठलराव खाडे, मेंगला पाटेकर यांनी ही तडाखेबाज भाषणे झाली. शिवसेना नगरसेवक प्रमोद मंडलिक, मच्छिंद्र धुमाळ, राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे ,मारुती मेंगाळ, , ॲड वसंत मणकर, कॉम कारभारी उगले , मिनानाथ पांडे, यमाजी लहामते आदींची भाषणे झाली.

जिल्हा बँक संचालक अमित भांगरे यांचा २७ वा वाढदिवस या वेळी साजरा करण्यात आला. दिलीप भांगरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास मोठी गर्दी करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here