प्रगतिपथावर असलेले घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाचे काम अंतीम टप्प्यात…

0
1014

प्रगतिपथावर असलेले घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाचे काम अंतीम टप्प्यात…

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचेकडून निर्माणाधीन रुग्णालयाची पाहणी व लवकरच रुग्णसेवेस सुरू करण्याचा विश्वास!


निर्माणाधीन अवस्थेतून पुर्णत्वास येत असलेल्या घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची रविवार, १९ मार्च रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांसह पाहणी केली.

निर्माणाधीन ग्रामीण रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर असून साधारणतः पुढील दोनेक महीन्यात पुर्णत्वास येणार आहे. आणि त्यानंतर घुग्घुस वासीयांच्या सेवेसाठी हे अत्याधुनिक रूग्णालय सेवेसाठी खुले होईल. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार राज्याचे अर्थमंत्री असतांना त्यांनी सन २०१८-२०१९ च्या अर्थसंकल्पात घुग्घुस करीता ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी तरतूद केली होती. परंतू मधल्या काळात राज्यात सत्तापरिवर्तन झाले होते आणि त्यापाठोपाठ आलेल्या कोरोना महामारीचे कारण पुढे करून तत्कालीन मविआ सरकारने ग्रामीण रुग्णालयाच्या निविदेला मंजुरी देण्यास टाळाटाळ केली होती.

सद्यस्थितीत ग्रामीण रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हे ग्रामीण रुग्णालय नागरिकांच्या सेवेस रुजू होणार आहे. अशी प्रतिक्रिया याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी दिली.

यासोबतच, रूग्णालयाच्या पुढे असणारे नविन बसस्थानक आणि पाठीमागचे पशु वैद्यकीय रुग्णालयाच्या इमारतीचेही बांधकाम लवकरच पुर्ण होऊन त्या ही वास्तू घुग्घुस वासीयांच्या सेवेसाठी खुल्या होऊन शहराच्या सौंदर्यात भर घालणार आहेत, असेही श्री. भोंगळे यावेळी म्हणाले.

याप्रसंगी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी सरपंच संतोष नुने, माजी ग्रा. पं. सदस्य साजन गोहने, सतीश बोंडे, सुरेंद्र जोगी, दिलीप कांबळे, विनोद जंजर्ला, वमशी महाकाली सोबत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here