राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा जळगावच्या ग्रिन हिल्सला अभ्यासदौरा

0
223

राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा जळगावच्या ग्रिन हिल्सला अभ्यासदौरा

अभ्यास दौऱ्यातून शेतकऱ्यांना कृषि क्षेत्रातील नवतंत्रज्ञान व संशोधनाची माहिती मिळते – देवराव भोंगळे

राजुरा, दि. १० जानेवारी
तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात होणार्‍या नवीन संशोधनाची तसेच प्रगत तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी काल (दि. ०९) उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने जळगाव येथील ग्रिन हिल्स येथे शेतकर्‍यांना अभ्यास दौऱ्यासाठी पाठविण्यात आले. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवासी वाहनाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना, तालुक्यातील शेतकऱ्यांना राज्यात सुरु असणारे कृषी विषयक नवनविन तंत्रज्ञान, संशोधन आदिंची प्रत्यक्ष माहिती मिळावी आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतात या संशोधनाचा, तंत्रज्ञानाचा अवलंब करता यावा, या उद्देशाने खरंतर शासनाच्या वतीने अशा अभ्यास दौऱ्यांची रचना करण्यात येते. राजुरा तालुक्यातील माझे शेतकरी बांधव सक्षम बनावेत आणि तंत्रज्ञान प्रसारामध्ये त्यांचा क्रियाशील सहभाग वाढावा म्हणून या दौऱ्यात जाणाऱ्या सर्व शेतकरीबांधवांनी ग्रिन हिल्स जळगाव येथे जाऊन अभ्यासपूर्ण माहीती घ्यावी. तुमच्या प्रवास दौऱ्याला माझ्या शुभेच्छा, असे प्रतिपादन माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी गिरीश कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी पायघन, भाजपा नेते वाघुजी गेडाम, विनोद नरेन्दुलवार, कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी आणि शेतकर्‍यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here