तात्काळ रस्त्याचे काम पूर्ण करून वाहतुक सुरळीत करण्याची मागणी
राजुरा/विरेंद्र पुणेकर : पौवनी ते हडस्ती या दहा किमीच्या रस्त्याची नुकत्याच झालेल्या रुंदीकरण व मजबुती करनाचे काम ठप्प असल्या मूळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता दिवसेंदिवस एका बाजूला अधिकच खचला जात असून खड्यांचे प्रमाण हि वाढत आहे. यामुळे या रस्त्यावर अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून या रस्त्यावर अनेक वाहनधारकांना आपला जीवही धोक्यात घालावा लागला आहे. स्तरावर खड्यांचे साम्राज्य होऊन रस्ता उखडला जात असून रस्त्याची पूर्णत: चाळण झालेली असल्याने पौवनी ते हडस्ती हा दहा किमीचा रस्त्या वरती डाबलि गेलेली खफी पूर्ण पने बाहेर आली असल्या मुळे वाहनधारकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते. त्यात वाह्नाचे नुकसान तर होते परंतु या कसरतीत रस्तावर किरकोळ व लहान मोठे अपघात नित्याचे घडत एकेरी अपघातही घडू लागले आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी पौवनी, काढोली बूज, बाबापूर, चार्ली, नीर्ली, हडस्ती या रस्त्यावरील गावातील ग्रामस्थांकडून होऊ लागली असून संबंधित बांधकाम विभागाने याकडे पुरपणे दुर्लक्ष केल्यामुळे नाहक कित्येक वाहनधारकांना आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे.
त्याच बरोबर मागील काही दिवसान अगोदर काढोली वासीयांनि संबंधित बांधकाम विभाकडे निवेदन स्वरूपात तक्रार देखील केली होती परन्तु अजोप ही विभागाकडून कुठलीही हाल चाल नाही असे दिसून येत आहे.
