आम आदमी पार्टी बाबुपेठ ने मनपाच्या निकृष्ट कामाची केली आयुक्तांकडे तक्रार

0
449

आम आदमी पार्टी बाबुपेठ ने मनपाच्या निकृष्ट कामाची केली आयुक्तांकडे तक्रार

 

आज दिनांक १/१२/२०२१ रोजी विकतु बाबा मंदिर जवळील माहेर घर परिसर येथे महानगर पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे चुकीच्या पद्धतीने कंत्राटदाराने नाली चे अर्धवट बांधकाम केल्याने वाहत आलेले संडास बाथरूम चे सांड पाणी हे तेथील नागरिकांच्या घरात जात असून संपूर्ण परिसरात ही घान पसरून आजूबाजूच्या लोकांना रोगराई ने सामोरे जावे लागत आहे, अशी तक्रार तेथील जनतेनी आप चे शहर सचिव राजु भाऊ कुडे यांच्या कडे केली तसेच
परिसरातील लोकांनी आप चे शहर सचिव राजु भाऊ कुडे यांना तक्रार करतांना सांगितले की एकूण ४ लोकांना मागील काही दिवसांत डेंग्यू मुळे रुग्णालयात भरती करावे लागले होते.

वारंवार नगर सेवक यांना तक्रार करून सुध्दा ते याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

जाणीवपूर्वक नालीचे अर्धवट काम करून जनतेचा जीव धोक्यात टाकण्यात आला आहे ही गंभीर बाब असून संबधित दोषी अधिकारी, ठेकेदार यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी तसेच अर्धवट नाली चे बांधकाम तात्काळ पूर्ण करावे असे निवेदन आयुक्तांना देण्यात आले या वरती तात्काळ कारवाई झाली नाही तर आम आदमी पार्टी बाबुपेठ परिसरातील जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरेल असे आप चे शहर सचिव राजु भाऊ कूडे यांनी म्हटले आहे.

निवेदन देताना आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनिल देवराव मुसळे कोषाध्यक्ष भिवराज सोनी आप चे शहर सचिव राजु भाऊ कुडे शाखा अध्यक्ष विशाल रामगिरवार, बाबाराव खडसे, दीपक निपाणे, सागर बोबडे, कालिदास ओरके, श्रीमती सुजाता ताई बोदेले, ऐश्वर्या वासनिक, अंजू रामटेके, पिंकी ताई कुकुडकर स्मिता लांडे, छाया इदे, विभा कुळमेथे, इंदिरा आलाम, सोनी कोसरे, अनिता सिडाम, गुड्डू मेश्राम, मंगला धूमने, महेश आलाम, अनुज चव्हाण, गणेश नाईक, मुकेश आलम, प्रवीण गजपल्लीवर, रामकृष्ण सिडाम, विलास दुमने, कालिदास कुमरे, विठ्ठल आलंम अमित देशमुख इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here