वाघाच्या हल्यात निष्पाप जीवाचा गेला बळी

0
666

वाघाच्या हल्यात निष्पाप जीवाचा गेला बळी

 

प्रतिनिधी/हिवदास बी.कुंभरे

चंद्रपूर/तळोधी : बाळापुर लगत असलेल्या आकापूर येथील खटू भानुजी कुंभरे (६७) हे नेहमी त्यांच्या लगत असलेल्या असलेल्या वनपरिक्षेत्रात बैल चारायला नेत असायचे.त्या प्रमाणे ते दि.१९/०६/२०२१ ला कक्ष क्र. ६९१ वन परिक्षेत्रात बैल चारत असतांना.
त्यावेळी अंदाजे ३.३०ते ४.००वाजताच्या दरम्यान अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला.
यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदरहु घटनेची माहिती गावकऱ्यांना कळताच परिसरात बघण्यासाठी एकच गर्दी झाली. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले.
दरम्यान मृतकाच्या नातेवाईकांना तातडीची २०००० रुपयांची मदत वन विभागामार्फत देण्यात आली. मृतकाच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे.या घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here