गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी मोठया संख्येने लसिकरण करावे – ना. देवेंद्रजी फडणवीस

0
555

गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी मोठया संख्येने लसिकरण करावे – ना. देवेंद्रजी फडणवीस

गडचिरोली जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा घेतला आढावा

मृत्युदर कमी करण्यासाठी लसिकरण महत्वाचे

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरला दिली भेट

सुखसागर झाडे : गडचिरोली जिल्हयातील कोरोना मृत्युदर कमी करण्यासाठी अधिकाधीक नागरिकानी कोविड लासिकरण करावे असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट दिली असता केले. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्हयातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला व जिल्हयात लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे निर्देश दिले. यावेळी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, जिल्हयाचे खासदार अशोकजी नेते, आमदार डॉ देवरावजी होळी, कृष्णाजी गजबे, जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, गडचिरोली जिल्हाधिकारी दिपकजी सिंगला, जी.प.सि. ई .ओ. कुमार आशीर्वाद, नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, जिल्हा श्यल्यचिकित्सक डॉ अनिल रुढे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शंभरकर, यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी देवेंद्रजी फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतांना जिल्ह्यात किती प्रमाणात लसीकरण झाले याबाबतची माहिती घेतली. जिल्हयातील अधिकाधीक लोकांना लस कशी उपलब्ध होईल व अधिकाधीक लसीकरण कसे होईल याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले व त्याबाबत तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here