लोकमत चिमूरचे भूतपूर्व तालुका प्रतिनिधी संजय वरघणेंची प्राणज्याेत मालवली

0
616

लोकमत चिमूरचे भूतपूर्व तालुका प्रतिनिधी संजय वरघणेंची प्राणज्याेत मालवली 

चिमूर (चंद्रपूर) किरण घाटे : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील मुळ रहिवाशी तथा विदर्भातील अग्रगण्य दैनिक लाेकमतचे चिमूरचे भूतपूर्व तालुका प्रतिनिधी संजय गणपतराव वरघणे यांचे आज शुक्रवार दि.७मे ला दुपारी वयाच्या ४८व्या वर्षि दुखद निधन झाले झाले .ते गेल्या काही दिवसांपासून आजारी हाेते. त्यांचे वर नियमितपणे उपचार सुरु हाेता.

संजय वरघणे यांनी बरीच वर्ष पत्रकारितेत घालवली. त्यांनी एका सामाजिक संस्थेत देखिल काम केले हाेते. अनेक सामाजिक संघटनेशी त्यांचे घनिष्ठ संबंध हाेते. एव्हढेच नाही तर त्यांचे गाेड स्वभावामुळे या जिल्ह्यातील फार माेठा मित्र परिवार त्यांचेशी जुळलेला हाेता. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here