संयुक्त प्रयत्नांमुळे सेलू (मुरपाड) येथे परिस्थिती आटोक्यात

0
498

संयुक्त प्रयत्नांमुळे सेलू (मुरपाड) येथे परिस्थिती आटोक्यात

हिंगणघाट, अनंता वायसे (७ मे) : तालुक्यातील सेलू मुरपाड येथे मोठ्या प्रमाणावर गावकरी कोरोणा बाधित निघाल्याने हे गाव प्रतिबंधित गाव म्हणून दिनांक 28 एप्रिल ला घोषित करण्यात आले होते .या गावात 70 गावकऱ्यांना कोरोणा झाला होता .परंतु परिस्थितीला न घाबरता ग्रामपंचायत च्या वतीने वेगवेगळी टीम तयार करून आढावा घेणे सुरू केल्याने आज हे गाव पूर्ण कोरोना मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. ग्रामपंचायत ने दररोज चार शिक्षकांची तीन टीम तयार केली. दररोज सकाळी आठ ते अकरा पर्यंत हे प्रथम टीमचे सदस्य कोरूना बाधित लोकांच्या घरी पोहोचून त्यांना विचारपूस करतात व नवीन लोकांना सर्दी-खोकला असे लक्षणे असलेल्या व्यक्तीस आढावा घेऊन त्याचा रिपोर्ट ग्रामपंचायत मध्ये सादर करतात .त्यानंतर चार शिक्षकांची दुसरी टीम साडेअकरा ते चार पर्यंत गावात फिरून आपला अहवाल ग्रामपंचायतला सादर करतात. त्यानंतर तिसरी टीम रात्री आठ वाजेपर्यंत फिरवून अहवाल नोंद करतात. या तीन चण्याची चमू चाअहवाल एकत्रित होते त्यानंतर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व ग्रामसेविका हे आपला अहवाल तयार करून दुस-या दिवशी सकाळी आठ वाजता आरोग्य पथकाकडे अहवाल देतात ते अहवाल पाहून आरोग्य विभाग गावातील रुग्णांना योग्य मार्गदर्शन करतात या संबंधात आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल रुईकर हे आरोग्य कर्मचारी सोबत सर्व नियोजन करीत आहे. सेलू मुरपाड ची आजची परिस्थिती पूर्ण गाव कोरोणा मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. ग्रामपंचायत सरपंच संदीप ठाकरे उपसरपंच रमेश पाटील सचिव ममता श्रीवास्तव तलाठी यांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर रुईकर यांच्यासोबत संयुक्त समन्वय साधून हे परिस्थिती आटोक्यात आणली आहे. यासंबंधात बीट जमादार वाघमारे पोलीस पाटील गाठले नोडल अधिकारी धारवाडकर आशा वर्कर पाटील ,अंगणवाडी सेविका खडसे , रेडलावार, मदत नीस गाठे ग्रामपंचायत सदस्य महेश खडसे सुरेश गौळकार संतोष उइके, केंद्रप्रमुख सुपारे जिल्हा परिषद मुख्याध्यापक दिलीप हाडके, गावंडे ,गमेसर , रवींद्र छापेकर, सचिन भगत यांच्या संयुक्त प्रयत्नाने हे शक्य होऊ शकले आहे. यासंबंधात प्रशासनाने सुद्धा वेळोवेळी मदत केल्यामुळे गावांमध्ये आजारी व्यक्ती मिळणार नाही या वाटेवर या गावाची वाटचाल सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here