गाेंडपिपरी -बल्लारपूरचे एसडीआे संजयकुमार ढव्हळेंना निलंबित करा

0
480

गाेंडपिपरी -बल्लारपूरचे एसडीआे संजयकुमार ढव्हळेंना निलंबित करा

चंद्रपूर जिल्हा महसुल कर्मचा-यांनी केली मागणी

चंद्रपूर, किरण घाटे : कुठलेही ठाेस कारण नसतांना गाेंडपिपरी – बल्हारपूरचे विद्यमान उपविभागीय अधिकारी संजयकुमार ढव्हळे यांनी गाेंडपिपरी येथील उपविभागीय कार्यालयातील कार्यरत महसुल सहाय्यक सुनिल चांदेवार यांचे विराेधात पाेलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला .त्या कर्मचा-यावरील कारवाई मागे घ्या व अतिशय उर्मट व बेशिस्त वागणा-या या एसडीआेवर तात्काळ निलंबनाची कारवाई करा या मागणीसाठी जिल्ह्याभरातील महसुल कर्मचारी वर्गांनी काल गुरुवार दि. ६मे ला दुपारी अंदाजे दुपारी २वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात व तालुका स्तरावर ढव्हळे यांचे विराेधात जाेरदार घाेषणाबाजी करीत जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले .दरम्यान चांदेवार यांचे वर खाेटा पाेलिस गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ महसुल कर्मचारी वर्गांनी काळ्या फिती लावुन शासकीय कामे केली .उपविभागीय अधिकारी संजय कुमार ढव्हळे कार्यालयीन सचाेटीचा नियमितपणे भंग करीत असुन ते कर्मचा-यांना असभ्यतेची वागणुक देत असल्यामुळे कर्मचारी पूर्णता त्रस्त झाले असल्याचे महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटना जिल्हा शाखा चंद्रपूर यांनी दि. ५मे ला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे .येत्या १७मे पर्यंत एसडीआे संजय कुमार ढव्हळे यांचेवर शासनाने निलंबनाची कारवाई केली नाही तर जिल्हाभर कामबंद करण्यांचा इशारा महसुल कर्मचारी संघटनेनी एका पत्रकातुन दिला आहे .काेराेना सारख्या महासंकटात महसुल कर्मचा-यांनी दिवस रात्र एक करुन प्राणाची पर्वा न करता प्रामाणिक पणे आपली कामे पार पाडली . विनाकारण महसुल कर्मचा-यांवर अश्या प्रकारच्या पाेलिस कारवाया करणे ही बाब याेग्य नसल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी आज या प्रतिनिधीशी बाेलतांना दिल्या .एसडीआे ढव्हळे यांनी चांदेवार यांचेवर केलेल्या पाेलिस कारवाई मुळे गाेंडपिपरी व बल्हारपूर महसुल विभागातील कर्मचारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .चंद्रपूर जिल्हा महसुल संघटनेने एसडीआे ढव्हळे यांचे बाबत एक निवेदन महसुल आयुक्त नागपुर यांना सादर केले असुन त्यांचेवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यांची मागणी त्यांनी या निवेदनातुन केली आहे .तदवचंच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचेसह खासदार ,आमदार , तसेच जिल्हा पाेलिस अधिक्षक यांना मागणी निवेदनाच्या प्रति सादर करण्यांत आल्याचे संघटनाच्या वतीने आज सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here