अवकाळी झालेल्या पावसाने शेतकरी झाला चिंतातुर ; पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान

0
564

अवकाळी झालेल्या पावसाने शेतकरी झाला चिंतातुर ; पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान

 

चामोर्शी/गडचिरोली, सुखसागर झाडे

चामोर्शी तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाचे अचानक आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्या हातचा घास हिरावून घेण्याची वेळ आल्याने शेतकरी वर्गात नैराश्य निर्माण झाले आहे.
सध्या सर्वत्र धान कापणी च्या कामाला सुरवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील धान्य कापलेले असून आज अचानक मेघगर्जनेसह आकाशातून पावसाच्या धारा, अन शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा एकसात ओसरताना दिसून आल्या आहेत.

शेतात कापणी केलेल्या धानावर पाणी आल्याने शेत बांधात पाणी साठून धान्याची नासधूस झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
शेतकरी बांधव शेतात वर्षभर राब-राब राबित, मोठे कष्ट उपसित कर्जाचे डोंगर उभारुन शेतीची मशागत करीत असतो. निसर्गाने अशा दिलेल्या झटक्याने हातात आलेला घास हिरावून घेतल्याने त्याच पिकांच्या भरोषावर शेतकऱ्याने बघितलेल्या स्वप्नांची राखरांगोळी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here