विद्यार्थ्यांना विद्याधन शिष्यवृत्ती योजनेत मुदतवाढ, १५ ऑक्टोंबर पर्यंत भरता येणार अर्ज

0
404

विद्यार्थ्यांना विद्याधन शिष्यवृत्ती योजनेत मुदतवाढ, १५ ऑक्टोंबर पर्यंत भरता येणार अर्ज

अधिकाधिक विद्यार्थांनी लाभ घेण्याचे यंग चांदा ब्रिगेडच्या विद्यार्थी शाखेचे आवाहन

विद्याधन शिष्यवृती योजनेत अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढी नुसार अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० संप्टेबर वरून वाढविण्यात आली असून आता पात्र विद्यार्थांना १५ ऑक्टोंबर पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. तरी अधिकाधिक विद्यार्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन यंग चांदा ब्रिगेडच्या विद्यार्थी शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

सरोजीनी दामोदरन फाउंडेशन बेंगळुर महाराष्ट्र शिष्यवृत्ती २०२० कार्यक्रम अतंर्गत ईयत्ता ११ विच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. याकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. हि शिष्यवृत्ती दारिद्ररेषेखालील विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून दोन लाख रुपयांखाली वार्षीक उत्पन्न, १० विच्या बोर्ड परीक्षेत ८५ टक्केपेक्षा अधिक गुण व प्रत्येक विषयात ए क्षेणी असलेले विद्यार्थी या विद्याधन योजनेस पात्र असणार आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांना सदर योजनेस पात्र ठरण्यासाठी ७० टक्के गूण असणे आवश्यक आहे. निवडक विद्यार्थ्यांना या योजने अंतर्गत ११ वि आणि १२ वि साठी ६ हजार रुपये प्रति वर्ष दिले जाणार आहे. तर या विद्यार्थ्यांची प्रगती उत्तम राहिल्यास त्यांच्या आवडीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी सदर योजनेंतर्गत प्रतिवर्ष ६ हजार ते १० हजार रुपये दिले जाणार आहे. ही योजना गरजू विदयार्थ्यांपर्यत पोहचविण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या विदयार्थी शाखेच्या वतीने शाळा महाविद्यालयात जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्या जात आहे. अर्ज सादर करण्याची ३० संप्टेबर पर्यंत असलेली शेवटची तारीख आता वाढविण्यात आली असून नव्या आदेशानुसार पात्र विद्यार्थंना १५ ऑक्टोंबर पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. तरी योजनेस पात्र असलेल्या विद्यार्थांनी संबंधित महाविद्यालयाशी किव्हा जैन भवन जवळील यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या विद्यार्थी शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here