जागतिक महिला दिनी मंदाताई पडवेकर सन्मानित…

0
549

जागतिक महिला दिनी मंदाताई पडवेकर सन्मानित…

चंद्रपूर- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत,
श्रिवाणी नॅचरोपॅथी केअर अँन्ड रिसर्च सेंटर व संकल्प आयुर्वेदा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्यां व साहित्यिक मंदाताई पडवेकर यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत, त्यांचा मि.आणि मिसेस यु तरुण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्रीवाणी नॅचरोपॅथी केअर सेंटर चे संचालक राहूल पडालवार सर , मंचाचे सर्व पदाधिकारी , सदस्यगण आणि सत्कारमूर्ती महिला गण यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला.तसेच यारीयाॅ साहित्य कला समूह कल्याण, मुंबई. तर्फे उत्कृष्ट समाजसेविका घोषित करत महिलांदिनानिमित्य सन्मान करुन त्यांना गौरवान्वित करण्यात आले. काव्य निनाद साहित्य मंच पूणे , यांच्या द्वाराही महिला दिनानिमित्त जेष्ठ-श्रेष्ठ महिला साहित्यीक,माता भगिनींचा सत्कार करण्यात आला. त्यात मंदाताई पडवेकर यांना विषेश महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे शहरातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here