जिवतीला युरिया खताचा तुरवडा; शेतकऱ्यांना करावा लागतो अनेक समस्यांच्या सामना

0
342

गोविंद वाघमारे/तालुका प्रतिनिधी जिवती

जिवतीला युरिया खताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे.अनेक कृषी सेवा केंद्रातून युरिया उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे.

जिवती तालुक्यात या हंगामातील कापूस, ज्वारी, सोयाबीन अश्या अनेक पिकांची खुरपणीची कामे झाली आहेत.या पिकांना नत्र खतांची म्हणजे युरियाची आवश्यकता आहे,सध्या युरिया खताची कापूस,ज्वारी,पिकासाठी मागणी आहे,मात्र युरियाची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

अश्यातच काही दुकानदाराकडे युरिया आहे,पण ते इतर रासायनिक खते घेतल्याशिवाय देत नसल्याचे सांगण्यात येत ज्यांच्याकडे साठवून आहे ते ज्यादा दराने विकत आहेत, त्यांच्यावर कृषी विभागाकडून योग्य कारवाई केली जावी अशी मागणी शेतकरी बांधवाकडून होत आहे.जिवती तालूका हा शेतीप्रधान असून शेती हाच येथील  प्रमूख व्यवसाय आहे,म्हणून तालुक्यातील नागरिकांनी अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये युरियाची विचारणा केली,परंतू उपलब्ध नसल्याने शेतकरी कोंडीत सापडला आहे, असे तालुक्यातील शेतकऱ्यांनचे म्हणने आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here