चंद्रपूर जिल्ह्याची कु. सानिया प्रवीण साखरकर महाराष्ट्रा कडून SGFI खेळणारी एकमेव खेळाडू

0
221

चंद्रपूर जिल्ह्याची कु. सानिया प्रवीण साखरकर महाराष्ट्रा कडून SGFI खेळणारी एकमेव खेळाडू

पंकज रामटेके
भारत सरकार द्वारा, स्कुल गेम फेडरेशन ऑफ इंडिया SGFI च्या वतीने आयोजित 19 वर्षा आतील आंतर शालेय कराटे क्रीडा स्पर्धा लुधियाना पंजाब येथे आयोजिली आहे. या स्पर्धे करिता महाराष्ट्रा कडून चंद्रपूर जिल्ह्याची कु. सानिया प्रवीण साखरकर ह्या एकमेव कराटे खेळाडू ची निवड झालेली आहे. कु. सानियाने जिल्हा क्रीडा संकुल बारामती पुणे येथे झालेल्या निवड चाचणीत अव्वल स्थान घेऊन न्याशनल स्पर्धेसाठी आपली जागा पक्की केलेली होती. कु.सानिया ही फिटटूफाईट्स मार्शल आर्ट्स अँड फिटनेस झोन जगन्नाथ बाबा नगर चंद्रपूर येथे प्रशिक्षक श्री. मुहाफिज सिद्दीकी, श्री. मंजित मंडल, श्री. नरेश थटाल व श्री. अंकुश मुळेवार यांचेकडे प्रशिक्षण घेत आहे. सानियाने आपल्या यशाचे श्रेय श्री महर्षी विद्यामंदिर चंद्रपूर च्या प्रिंसिपल श्रीलक्ष्मी मूर्ती मॅडम, फिटटूफाईट्स चे डायरेक्टर शिहान विनय बोढे सर तसेच आपल्या आईवडिलांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here