आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांतून मतदार संघातील 10 गेटेड साठवण बंधा-यांसाठी 14 कोटी 29 लक्ष रुपयांचा निधी मंजूर

0
224

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांतून मतदार संघातील 10 गेटेड साठवण बंधा-यांसाठी 14 कोटी 29 लक्ष रुपयांचा निधी मंजूर

शेकडो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार…

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीला मोठे यश आले असून चंद्रपूर मतदार संघातील गेटेड बंधा-यांसाठी 14 कोटी 29 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून ग्रामीण भागात 10 ठिकाणी गेटेड बंधारे तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेकडो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.

चंद्रपूर मतदार संघातील ग्रामीण भागात विकासाला गती प्राप्त झाली आहे. येथील विकासकामांसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध विभागांतर्गत मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून येथे अनेक सोयी सूविधा उपलब्ध केल्या जात आहे. 13 जानेवारीला शनिवारी ग्रामीण भागातील 11 कोटी 13 लक्ष रुपयांच्या 51 विकासकामांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन केल्या जाणार आहे.

दरम्यान ग्रामीण भागात गेटेड बंधारे बांधण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानंतर सदर मागणी पूर्ण करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न सुरु होते. यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मृद व जलसंधारन मंत्री संजय राठोड यांना निवेदन दिले होते. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर त्यांच्या या पाठवूराव्याची दखल घेण्यात आली असून सदर मागणी मान्य करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्र जलसंधारन महामंडळच्या वतीने 14 कोटी 29 लक्ष 1 हजार 245 रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या निधीतून मतदार संघातील 10 ठिकाणी गेटेड बंधारे तयार करण्यात येणारे आहे. यात आरवट -हिंगनाळा – शिवणी चोर येथील बंधा-यासाठी 1 कोटी 85 लक्ष रुपये, वढा – उसगाव येथील दोन बंधा-यासाठी 2 कोटी 65 लक्ष, सोनेगाव – अंतुर्ला येथील दोन बंधा-यासाठी 3 कोटी 25 लक्ष रुपये, वेंढली 1 आणि वेंढली 2 येथील बंधा-यासाठी 3 कोटी 70 लक्ष, पांढरकवडा येथील बंधा-यासाठी 86 लक्ष, दाताळा – चिंचाळा येथील बंधा-यासाठी 88 लक्ष रुपये खर्च करुन गेटेड बंधारे बांधण्यात येणार आहे.

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प आपण केला आहे. यासाठी विविध विभागाअंतर्गत निधी आपण उपलब्ध करुन देत आहोत. येथील शेतीला मुबलक पाणी मिळावे यासाठी आपण आराखडा तयार केला होता. यात गेटेड बंधारे बांधण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तेव्हा पासून सदर बंधा-यांसाठी निधी मंजूर करण्याची मागणी आपण केली होती. याचा पाठपूरावाही आपण सातत्याने सूरु ठेवला होता. याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मृद व जलसंधारन मंत्री संजय राठोड यांनी घेतली आहे. एक मोठी मागणी मार्गी लावता आली याचे समाधान आहे. तयार होणार असलेल्या या गेटेड बंधा-यांमुळे शेकडो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मृद व जलसंधारन मंत्री संजय राठोड यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here