गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. हरीश जी उईके यांचे महिपाल मडावी यांचे कडून जंगी स्वागत

0
646

गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. हरीश जी उईके यांचे महिपाल मडावी यांचे कडून जंगी स्वागत

राजुरा/अमोल राऊत, २४ फेब्रु. : गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. हरीश जी उईके यांचे चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम आगमन झाले या प्रसंगी चंद्रपूर येथिल विश्रामगृहात सदिच्छा भेट दिली व पुष्पगुच्छ देऊन स्वागत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवा विदर्भ साचिव महिपाल मडावी यांनी केले.

महिपाल मडावी यांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ अध्यक्ष चंद्रशेखर मडावी यांनी माहिती देताच महिपाल मडावी यांनी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हा महासचिव भारत आत्राम यांना माहिती देऊन स्वागताची जंगी तयारी केली.

यावेळी गोंडवाना गणतंत्र पार्टी चे जिल्हा अध्यक्ष बापुराव मडावी, राजूरा विधानसभा अध्यक्ष गजानन गोदरू पाटिल जुमनाके, जिल्हा उपाध्यक्ष अब्दूल जमीर भाई, जिल्हा महासचिव भारतजी आत्राम, गोगपाचे जेष्ठ नेते व माजी जि.प.सदस्य विजयसिंह मडावी, जिल्हा युवक अध्यक्ष गणपतजी नैताम जेष्ठ मार्गदर्शक ममताजी जाधव. या वेळी प्रदेशाध्यक्ष हरीश जी उईके यांचे सोबत नागपूर वरून आलेले प्रदेश उपाध्यक्ष सुखलालजी मडावी, प्रदेश महासचिव सुधाकर जी आत्राम, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण विभाग) प्रदीप गेडाम, युवक नेतृत्व सचिन मसराम व चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी पक्ष वाढीवर व सामाजिक चळवळीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here