ग्रामपंचायत दुर्गापूर च्या हद्दीत घाणीचे साम्राज्य, जनतेच्या आरोग्याशी खेळ

0
567

ग्रामपंचायत दुर्गापूर च्या हद्दीत घाणीचे साम्राज्य, जनतेच्या आरोग्याशी खेळ

Impact 24 news

चंद्रपूर/प्रतिनिधी : देशपातळीपासून ते गावपातळीपर्यंत स्वच्छतेकरिता प्रत्येक गावाकरिता लाखो, करोडो रुपयांचा निधी वितरीत केल्या जातो. अन तो निधी नागरिकांच्या सवच्छतेच्या दृष्टीने केला जातो. मात्र, त्या निधीची विल्हेवाट स्वच्छतेच्याच दृष्टीने करणे हे काम स्थानिक प्रशासनाचे असते व त्या निधीतून शहर स्वच्छतेवर भर देणे हे कामही तेवढेच महत्त्वाचे असते.

 

‘स्वच्छ भारत…स्वच्छ शहर’चा नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडून आवाहन करण्यात येऊन गाव शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. मात्र, ग्रामपंचायत दुर्गापूर हद्दीतील भीमनगर वार्ड क्रमांक ४ येथील अंगणवाडी तसेच बलोद्यान परिसरातील वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या परिसरात घाणीचे आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना अंगणवाडी तसेच बलोद्यानात येणाऱ्या मुलांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, त्यांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीच्या आरोग्य किंवा स्वच्छता विभागाने येथील कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी सूचना अखिल भारतीय समता सैनिक दल चंद्रपूर जिल्याचे सदस्य संदीप देठेकर यांनी ग्रामपंचायत दुर्गापूर ला केली आहे. एकीकडे कोरोनाची धास्ती अन गाव परिसरात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे भविष्यात कोरोनाच्या फैलावाला रोखता रोखता दुसऱ्याच आजाराने तोंड वर काढल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधूनच उपस्थित केल्या जात आहे.

 

सदर तक्रार निवेदन संदीप देठेकर यांच्या मार्फत परिसरातील पंकज वाघमारे, शैलेश सोनटक्के, गोपाल मेश्राम, दीपक भोंडेकर, निखिल खंदारे, महेंद्र मेश्राम आणि इतर नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here