यावली ( शहिद) येथे खरिप पुर्व नियोजना बाबत शेतक-यांना मार्गदर्शन.                                       

0
453

यावली ( शहिद) येथे खरिप पुर्व नियोजना बाबत शेतक-यांना मार्गदर्शन.       

 

 शिराळा प्रतिनिधी/✍🏻 डी.आर. वानखडे.           

 

अमरावती/ शिराळा :- नजिकच्या यावली शहिद येथे खरीप पुर्व नियोजना बाबत शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात आले. अमरावती तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सोयाबीन उगवन क्षमता तपासणे व बिजप्रक्रिया करणे. सोयाबीन लागवड करिता पट्टापेर , बीबीएफ तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे फायदे समजावुन सांगण्यात आले..

त्यामध्ये मुलस्थानी जलसंधारण होते. पावसात खंड पडल्यास अथवा पाणी कमी असल्यास या पध्दतीमुळे वरंब्यावर ओलावा टिकवुन ठेवला जातो. पिकाला पाण्याचा ताण पडत नाही. पाऊस जास्त झाल्यास या पध्दतीमधील सरी मधुन अतिरिक्त पाणी बाहेर पडते. सोयाबीन पेरणीसाठी 20–25 टक्के बियाणे कमी लागते. उत्पन्नामध्ये 25–30 टक्के हमखास वाढ होते. पिक मोठे झाल्यावर पिकाची आंतरमशागत करणे , सरीमधुन औषध फवारणी करणे , आवश्यकता भासल्यास स्प्रिंकलव्दारे सुरक्षित पाणी देण्यासाठी ही पेरणी पध्दत फायदेशीर ठरते. निंबोळी अर्क तयार करणयाची पध्दत व फवारणीचे महत्व , १० टक्के रासायनिक खताची बचत करणे या विषयी शेतक-यांना मार्गदर्शन केले.

यावेळी मंडल कृषी अधिकारी दिपक वानखडे , कृषी पर्यवेक्षक राजेंद्र धर्माळे , यावली शहिद येथील कृषी सहाय्यक प्रशांत राऊत व शेतकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here