चंद्रपूरची ऊन

0
464

चंद्रपूरची ऊन

चंद्रपूरची भयानक कडक ऊन ,
जसा लावारस  सांडला आभाळातुन

सकाळ होताच बरसतात ज्वाला सुर्यातुन ,
जशी कानाला तापवीनारी एखादी बेसूर धून

गरम वाफा डोक्यावरच्या छतातुन ,
घामाच्या धारा साऱ्या शरीरातून

पंखे ,कुलर ,एसी जातात उन्हापुढे त्रासून ,
ऊन मात्र नाचत असते डोक्यावर बसून

रस्ते होतात सामसूम, झाडे जातात कोमेजुन ,
घराबाहेर पडताच अंग जाते भाजुन

पशुपक्षीही व्याकुळ होतात पान्याला शोधून ,
मग निजून जातात एखादी सावलीची जागा बघुन

अतृप्त तहान कोरडा घसा राहुन राहुन ,
यंदा तरी पाऊस लवकर पडावा हिच इच्छा सर्व जनतेच्या मनातून….

शैलेश दा. नंदनवार
चंद्रपूर
मो. ९५६१११२१७६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here