लॉ कॉलेज ते चव्हाण कॉलनी जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करून स्ट्रीट लाईट लावण्याची आ. किशोर जोरगेवारांकडे राकेश नाकाडेंसह इत्तरांची मागणी 

0
474

चंद्रपूर विदर्भ -किरण घाटे

लॉ कॉलेज ते चव्हाण कॉलनी जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करून स्ट्रीट लाईट लावण्याची आ. किशोर जोरगेवारांकडे राकेश नाकाडेंसह इत्तरांची मागणी
चंद्रपूर विदर्भ -किरण घाटे वि.प्र.
स्थानिक छत्रपती व तीर्थरूप नगर येथील रहिवाश्यांना तुकुम परिसरात, बंगाली कॅम्पला तसेच कोणत्याही कामाकरिता ये जान करण्यासाठी लॉ कॉलेज ते चव्हाण कॉलनी जाणारा रस्ता सोयीचा आहे. तसेच या मार्गाने तुकुम परिसरातील तथा सरकार नगर परिसरातील नागरिक मोठया संख्येने मॉर्निंग वॉक, इविनिंग वॉक करिता येत असतात तसेच विद्यार्थ्यांना शाळेसाठी व ट्यूशन करीता सुद्धा याच मार्गाने जावे लागते. उपराेकित मार्गावर दोन्ही बाजूने झुडपे तयार झालेले आहे . लॉ कॉलेजच्या गेटजवळ तुकुम परिसरातील कचरा संग्रहित करण्याचे काम सुध्दा केले जाते त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. तसेच अस्वल सारख्या जंगली प्राण्यांचा वावर सुद्धा या भागात होताना दिसतोयं स्ट्रीट लाईट नसल्याने अंधारात जाता येताना या भागातील नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. अंधाराचा फायदा घेऊन एखादी अनुचित घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे या भागातील नागरिकांच्या सोयी करीता रस्त्याची दुरवस्था दूर करून स्ट्रीट लाईट लावण्याच्या मागणीचे निवेदन आमदार किशोरजोरगेवार यांना आज दि. १०जूलैला देण्यात आले. सदरहु प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन आ. जोरगेवार यांनी या वेळी दिले. निवेदन देतांना राकेश नाकाडे , सचिन चलकलवार, प्रसाद खाडिलकर , विपीन येलमुले आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here