मोठ्या भावानेच केली लहान भावाच्या घरातील साहित्याची तोडफोड

0
462

मोठ्या भावानेच केली लहान भावाच्या घरातील साहित्याची तोडफोड

घुग्घुस येथे भावानेच भावाच्या घरातील साहित्याची तोडफोड केल्याची घटना शनिवार, ८ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.

फिर्यादी- देवानंद टिपले (४४ रा. शास्त्रीनगर, घुग्घुस) हे शुक्रवार, ७ जुलै रोजी कामानिमित्त बाहेर गावी गेले होते.
काम झाल्यानंतर शनिवार, ८ जुलै रोजी सायंकाळी घरी परत आले असता अंगणासमोरील सिसिटीव्ही कॅमेऱ्याचे तार तुटलेली दिसली नंतर दरवाजा उघडण्यासाठी गेले असता दरवाज्याचे कुलूप तुटलेला दिसला. नंतर डीव्हीआर बघितले असता त्यांचा मोठा भाऊ अरुण टिपले हा तार व कुलूप तोडतांना दिसला.

त्यामुळे फिर्यादी देवानंद टिपले यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली तक्रारी वरून आरोपीविरुद्ध कलम ४२७ गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here