ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त छोटया दुकानदारांना छत्री वाटप

0
271

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त छोटया दुकानदारांना छत्री वाटप

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी भारताच्या अखंडतेसाठी प्राणाचे बलिदान देणारे प्रखर राष्ट्रवादी नेते- देवराव भोंगळे

घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात गुरुवार, ६ जुलै रोजी सकाळी ‘एक देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान नही चलेंगे’ चा नारा देणारे जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, भारताची एकता व अखंडतेसाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपल्या प्राणाचे बलिदान देणारे प्रखर राष्ट्रवादी नेते होते. देशात कलम ३७० हटविण्यासाठी आवाज बुलंद केला देशात चळवळ उभी केली आणि या आंदोलनाला धार देण्यासाठी एक देश मे दो विधान, दो प्रधान, दो निशान नही चलेंगे असा नारा दिला. त्यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त छोटया दुकानदारांना छत्री वाटप करण्यात आली.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे गणेश कुटेमाटे, श्रीकांत बहादूर, विनोद जंजर्ला, सतीश बोन्डे, राजेंद्र लुटे, अमीना बेगम, सुनंदा लिहीतकर, खुशबू मेश्राम, नेहा कुम्मरवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here