यंग चांदा ब्रिगेड विज कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांना सन्मान मिळवून देण्यासाठी संघर्ष करा – आ. किशोर जोरगेवार

0
363

यंग चांदा ब्रिगेड विज कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांना सन्मान मिळवून देण्यासाठी संघर्ष करा – आ. किशोर जोरगेवार

आ. जोरगेवार यांच्या हस्ते धारीवाल कंपणी येथील विज कामगार संघटनेच्या फलकाचे लोकार्पण

कामगार हा विकास प्रणालीतील महत्वाचा घटक आहे. तो थांबला तर विकास थांबतो, कामगारांच्या श्रमावरच उद्योग धंदे उभे राहतात. असे असले तरी मात्र कामगार क्षेत्राकडे नेहमीच दुर्लक्ष झाले असून कामगारांना अद्यापतरी त्यांचा पूर्ण हक्क मिळालेला नाही. फक्त वेतन देवून चालणार नाही तर त्यांना सन्मानही दिल्या गेला पाहिजे असे मत मांडत कामगारांच्या रास्त मागण्या सोडविण्यासह त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडची विज कामगार संघटणा संघर्ष करेल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आज शुक्रवारी धारीवाल इंन्फ्रास्ट्रक्चर कंपणी येथील यंग चांदा ब्रिगेड विज कामगार संघटनेच्या फलकाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेड विज कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रुपेश झाडे, कोषाध्यक्ष विजय सोनटक्के, वीरेंद्र गुरफुडे, सचिव अॅड. राम मेंढे, सहसचिव क्षितीज खांडरे, विशेष सल्लागार बाळकृष्ण जुवार यांच्यासह कार्यकारी सदस्यांची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, धारीवाल कंपनीत काम करणा-या कामगारांच्या अनेक मागण्या प्रलंबीत आहे. या मागण्या सोडविण्याच्या दिशेने आपले प्रयत्न सुरु आहे. या संबधीत उपमुख्यमंत्री अजित पवार व कामगार मंत्री यांच्यासह कंपणी व्यवस्थापनाशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे बैठक घडवून आणली. या कंपनीने १ हजार लोकांना रोजगार देण्याचे सांगत स्वस्त जमीन आणि पाणी मिळवीले मात्र प्रत्यक्षात केवळ ६५० जणांना रोजगार देण्यात आला आहे. दिलेला रोजगारही अस्थायी स्वरुपाचा आहे. ज्या कंपणीत २४ तास विजेचे उत्पन्न घेतल्या जात असेल तेथे अस्थायी स्वरुपाचे काम राहतेच कसे असा प्रश्न उपस्थीत करत येथील कामगारांना स्थायी स्वरुपी नौकरीत सामावून घेतल्या जावे यासाठी माझा संघर्ष सुरु असून यंग चांदा ब्रिगेड विज कामगार संघटनेच्या माध्यमातून हा संघर्ष पूढे नेल्या जाईल असे यावेळी आ. जोरगेवार यांनी सांगीतले. येथील कामगारांना २० टक्के वेतन वाढ दिल्या जावी याकरीताही लढा उभारला जाणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केले. यंग चांदा ब्रिगेड ही परिवर्तन करणारी संस्था असून वेळोवेळी कामगारांच्या हक्कासाठी विज कामगार संघनेच्या माध्यमातून पाऊल उचलले जाईल असेही ते या प्रसंगी बोलले. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडचे कलाकार मल्लारप, अमोल शेंडे, राकेश पिंपळकर, राशिद हुसेन, हरमन जोसेफ, विनोद अनंतवार, पंकज गुप्ता, प्रतिक शिवणकर, विलास सोमलवार, मुन्ना जोगी, अजय दुर्गे, राहूल मोहुर्ले, प्रकाश पडाल,यांच्यासह कामगार व गावक-यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here