राजुरा येथील कांग्रेस चे माजी नगरसेवक, शिर्शी ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य सहित विविध कार्यकर्त्यांचा श्रमिक एल्गार संघटनेत प्रवेश

0
1051

राजुरा येथील कांग्रेस चे माजी नगरसेवक, शिर्शी ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य सहित विविध कार्यकर्त्यांचा श्रमिक एल्गार संघटनेत प्रवेश

राजुरा प्रतिनिधी
दिनांक – १२/१२/२०२०
राजुरा तालुक्यातील बामनवाडा येथे प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला असून श्रमिक एल्गार संघटनेत राजुरा नगरपरिषदेचे काँग्रेसचे माजी नगरसेवक संतोष मेश्राम, शिर्शी ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच गांगाजी आदे, विद्यमान सदस्य रविसदास किंनाके, यांनी श्रमिक एल्गार संघटनेत प्रवेश घेतला असून यासहित कार्यकर्ते सतीश कुळमेथे कोहपरा, किंकर हलदार राजुरा, उषा लोखंडे साखरवाही, गंगा टेकाम बामनवाडा, रेखा टेकाम चूनाला, सुनील गेडाम बेरडी, कुंदा भालवे कोहपरा, यासहित इत्यादी कार्यकर्ते संघटनेत प्रवेश घेतला.

प्रवेशाची जिम्मेदारी प्रामुख्याने श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांनी पार पाडली असून कार्यक्रमात श्रमिक एल्गार चे महासचिव ऍड. कल्याण कुमार यांनी मार्गदर्शन केले श्रमिक एल्गार संघटना मागील विस वर्षांपासून जिल्ह्यात कार्यरत असून संघटनेच्या जोरावर गोरगरिबांचे कामे करावे व श्रमिक एल्गार चे कार्यकर्ते म्हणून नागरिकांचे कामे करतांना येणारा अनुभव सांगावे असे आव्हान यावेळी प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांना कल्याण कुमार यांनी केले.

यावेळी तुळशीराम किनाके, बिंदू हलदार, शिला आत्राम, निळा कोडापे, शकुंतला कोडापे व इतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन लोमेश मडावी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here