आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घुस मध्ये रुग्णांकरिता औषध वितरण……

0
421

आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घुस मध्ये रुग्णांकरिता औषध वितरण……

 

घुग्घुस दि. 06 नोव्हेंबर २०२२ रविवार रोजी आम आदमी पार्टी घूग्घुस शहर अध्यक्ष अमित बोरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शहर अध्यक्ष अमित बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली औषधांचे वितरण करण्यात आले. घुग्घुस शहरामध्ये असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असलेल्या औषधांचा तुटवडा बघता आम आदमी पार्टी द्वारा गोर गरीब नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता त्यांना इतरत्र कुठेही भटकंती करावी लागणार नाही याची दखल घेत अंदाजे ५०० नागरिकांकरिता औषध वितरित करण्यात आली.

प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घुस मध्ये घुग्घुस च नाही तर आजूबाजूच्या गावातील नागरिक सुद्धा इथे उपचाराकरिता येतात. त्यामुळे त्यांच्या उपचाराकरिता गैरसोय होऊ नये व त्यांना मोफत औषध उपलब्ध होईल याची काळजी घेऊन औषध वितरित करण्यात आले.

यावेळी आम आदमी पार्टी शहर अध्यक्ष अमित बोरकर यांनी संदेश दिला की वाढदिवसाचे बॅनर लाऊन त्यामध्ये पैसे व्यर्थ घालविण्यापेक्षा त्याच पैशाने नागरिकांना औषध उपलब्ध करून देणे ही जन सेवा आहे व जन सेवा हीच ईश्वर सेवा व जन सेवेकरीता आम आदमी पार्टी सदैव तत्पर आहे व राहील सोबतच सर्व घुग्घुसच्या नागरिकांना आवाहन करण्यात आले की आपणही अशा प्रकारची मदत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपल्या वाढदिवसाला करावी असे आवाहन करण्यात आले.

शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, सहसचिव विकास खाडे, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप धणविजय, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई व कार्यकर्ते तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here