डेंगू, मलेरियाचे रुग्णसंख्या वाढत असल्याने संपूर्ण शहर व ग्रामीण भागातील फॉगिंग मशीन व स्प्रे पंपाद्वारे औषधीची फवारणी करा – माजी आमदार प्रा. राजु तिमांडे

0
457

डेंगू, मलेरियाचे रुग्णसंख्या वाढत असल्याने संपूर्ण शहर व ग्रामीण भागातील फॉगिंग मशीन व स्प्रे पंपाद्वारे औषधीची फवारणी करा – माजी आमदार प्रा. राजु तिमांडे

माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना दिले पत्र

हिंगणघाट (वर्धा), तालुका प्रतिनिधी अनंता वायसे
संपूर्ण शहर व ग्रामीण भागातील परिसरात डेंगू मलेरिया तापाची लागण झाली असून फॉगिंग मशीन द्वारे व पाठीवरील स्प्रे पंपाद्वारे औषधीची फवारणी करण्याबाबत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी जिल्हाधिकारी वर्धा,मुख्याधिकारी नगरपरिषद हिंगणघाट, प्रशासकीय अधिकारी नगरपंचायत समुद्रपूर,प्रशासकीय अधिकारी नगरपंचायत सिंदी रेल्वे, बि.डि.ओ पंचायत समिती हिंगणघाट, समुद्रपूर व सेलू तालुका यांना उपविभागीय अधिकारी मार्फत पत्र देण्यात आले.
परिसरातील शहर व ग्रामीण भागात डेंगू मलेरियाच्या तापाची लागण झाली असून फॉगिंग मशीन द्वारे व पाठीवरील स्प्रे पंपाद्वारे औषधीची फवारणी करण्याचे आदेश आपण नगरपरिषद,नगरपंचायत, ग्रामपंचायत,स्तरावर देऊन जनतेला दिलासा द्यावा.

 

 

शहरातील व ग्रामीण भागातील नाल्या, गटारे,मोकळ्या जागा, रिकामे खंडर यांची साफसफाई न झाल्यामुळे खराब पाण्याचे डबके निर्माण झाले आहेत आणि तेच डबके आता डास निर्मितीचे केंद्र बनले आहेत. संपूर्ण परिसरात डेंग्यू व मलेरियाच्या तापाचे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणात वाढले असून साथीच्या रोगाने थैमान घातले असताना नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत स्तरावर फॉगिंग मशीन व पाठीवरील स्प्रे पंपाद्वारे औषधीची फवारणी करणे आवश्‍यक आहे तसेच नाल्या व गटारांची साफसफाई करून कचरा उचलणे आवश्यक आहे.

 

 

साथीच्या रोगाची रक्त तपासणी उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे व्हायला पाहिजे तसेच रुग्णांना औषधीच्या पुरवठा दवाखान्यातूनच दिला पाहिजे. परंतु रक्त तपासणी व औषधेचा पुरवठाही बाहेरून करावा लागत आहे. तरी प्रत्येक सरकारी रुग्णालयाला आदेश देऊन रुग्णांची रक्त तपासणी व औषधांचा पुरवठा करण्यात यावा.

 

 

आठवडी बाजारात कचऱ्याचे ढिगारे लागली असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे डासांची संख्या वाढली असून जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी जिल्हाधिकारी या नात्याने आपण प्रशासनाला आदेश देऊन जनतेचे हित जोपासावे अशी विनंती माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी जिल्हाधिकारी वर्धा,मुख्याधिकारी नगरपरिषद हिंगणघाट, प्रशासकीय अधिकारी नगरपंचायत समुद्रपूर, प्रशासकीय अधिकारी नगरपंचायत सिंदी रेल्वे, बि.डि.ओ पंचायत समिती हिंगणघाट, समुद्रपूर व सेलू तालुका यांना पत्राद्वारे केली आहे.

 

 

संपूर्ण शहरी व ग्रामीण भागातील डेंगू,मलेरिया तापाची लागण झाली असून फॉगिंग मशीन व पाठीवरील स्प्रे पंपाद्वारे औषधाची फवारणी करण्यात यावी तसेच रक्त तपासणी उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे व्हायला पाहिजे व रुग्णांना औषधीचा पुरवठा दवाखान्यातूनच दिला पाहिजे जेणेकरून गोरगरीब जनतेला याचा दिलासा मिळेल यासाठी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here