सिंदेवाही येथील पत्रकारावर हल्ला केलेल्या गाव गुंडावर कडक कार्यवाही करा : पुरोगामी पत्रकार संघ, जिवती

0
317

सिंदेवाही येथील पत्रकारावर हल्ला केलेल्या गाव गुंडावर कडक कार्यवाही करा : पुरोगामी पत्रकार संघ, जिवती

ठाणेदार,पोलिस स्टेशन जिवती मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक याना दिले निवेदन

सिंदेवाही तालुक्यात ग्रामीण भागात राहून तालुक्यातील घडामोडी डिजिटल मिडियाच्या माध्यमातून जन मानसात मांडण्याचे काम अरुण मादेसवार हे प्रामाणिकपणे पार पाडित आहेत. हे काम करीत असतानाच गुंजेवाही येथील वनजमिनिवर असलेले अतिक्रमणाचे वृत्त डिजिटल मिडियाच्या माध्यमातून उजेड़ात आणले त्याची दखल घेऊन वन अधिकाऱ्यांनी त्या अतिक्रमण करण्यात आलेल्या वन जमीनी संबंधी चौकशी केली. याचाच राग मनात घेऊन तेथीलच काही गवगुंडानी अरुण मादेसवार याना मारण्याचे कटकारस्थान करुन अरुण मादेसवार हे गूंजेवाही वरुन सिंदेवाहीला आपल्या मुलासह जात असताना मध्येच रस्त्यात त्याना अडवून आमची बातमी का लावली ? असे म्हनत अश्लील शिविगाळ करीत त्याना व त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केली. त्यात ते गम्भीर जखमी आहेत. गाव गुंडाकडुन केलेले हे क्रूर कृत्य अतिशय निंदनीय असून माणूसकिला काळीमा फासनारे आहे.
सदर गाव गुंडानी केलेल्या क्रूर कृत्याचा पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र विरोध करण्यात येत असून मारहाण करणाऱ्या गाव गुंडावर कड़क कार्यवाही करून त्यांच्यावर कठोर शिक्षा करावी अशा आशयचे निवेदन पुरोगामी पत्रकार संघ तालुका जिवती च्या वतीने ठाणेदार पोलिस स्टेशन जिवती मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक,पोलिस मुख्यालय जिल्हा चन्द्रपुर याना देण्यात आले.
याप्रसंगी सय्यद शब्बीर, अध्यक्ष, पुरोगामी पत्रकार संघ,तालुका जिवती, दिपक साबने, सचिव, पुरोगामी पत्रकार संघ, तालुका जिवती, रमाकांत जंगापल्ले, उपाध्यक्ष,पुरोगामी पत्रकार संघ, तालुका जिवती, संतोष इंद्राळे, उपाध्यक्ष, पुरोगामी पत्रकार संघ, तालुका जिवती, बंटी ब्राम्हणे, सदस्य,पुरोगामी पत्रकार संघ, तालुका जिवती एडवोकेट सचिन मेकाले इत्यादि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here