वाघांची दहशत असल्याने कापूस वेचणीसाठी कोणी येई ना !

0
591

वाघांची दहशत असल्याने कापूस वेचणीसाठी कोणी येई ना !

सतर्कतेचा इशारा देण्यासाठी गावागावात दवंडी

 

११ ट्रप कॅमेरे,४६ वनविभागाचे कर्मचारी वाघाच्या बंदोबस्तासाठी

रुपेश मंकिवार


पोंभूर्णा:-

पोंभूर्णा वनपरीक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या शेतशिवारात वाघाच्या हल्ल्याचे एकामागे एक झालेल्या घटनांमुळे परिसरात खळबळ माजली आहे. सलग तीन दिवसात तीन घटना घडले असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

कसरगट्टा बिटातील कविटबोळी शेतशिवारात कापूस वेचणीसाठी गेलेल्या महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना २४ नोव्हेंबरला घडली. यात कसरगठ्ठा येथील बेबीताई हनुमान धोडरे या महिलेचा मृत्यू झाला. हि गोष्ट ताजी असतांनाच दुसऱ्या दिवशी पोंभूर्णा येथे दुचाकीस्वार युवकावर वाघाने झडप घातली यात तो गंभीर जखमी झाला. तिसर्या दिवशी चेक बल्लारपूर शेतशिवारात बकऱ्यावर हल्ला चढवून एक बकरी ठार केले.

पोंभुर्णा तालुक्यात कापुस व धानाचे पिक घेतले जाते आता कापुस तोडणी व धान मळणी सुरू आहे.पण वाघाच्या दहशतीने शेतकऱ्यांना मजुर नकार देत आहेत. यामुळे कापुस तिथेच पळून आहे. वाघाच्या वावरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिगडत आहे. कापसाचे उभे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यात याव्यात तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

—————————–

तालुक्यात वाघाची नेमकी संख्या किती

-पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातील वेगवेगळ्या ठिकाणी वाघाच्या हल्ल्याचे अनेक घटना घडल्या आहेत.यात काहींना प्राण गमवावे लागले आहेत तर काहीजण गंभीर जखमी झाल्याचे घटना आहेत. तालुक्यातील वाघांचे वावर मोठ्या प्रमाणात असल्याने दिसुन येते चेक बल्लारपूर, कसरगट्टा,व सेलुर नागरेड्डी या ठिकाणी एकाच वेळी तिन च्या दरम्यान वाघांचे दर्शन झाल्याचे प्रथमदर्शनी सांगितले. यामुळे पोंभूर्णा तालुक्यात नेमके किती वाघ आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

————————————-

वाघाच्या हल्ल्यात आणखी किती बळी

कोरोणा काळात लाकडाऊन असल्याने लोक बाहेर जाणे टाळले होते लाकडाऊन संपल्यावर आपल्या गाईंना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या चेक आष्टा येथील पुरुषोत्तम मडावी याचा मार्च महिन्यात वाघाने बळी घेतला आहे तर कसरगट्टा येथील बेबीताई हनुमान धोडरे या महिलेचा शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवून ठार केले. वेगवेगळ्या घटनेत आठ जणांना वाघाने गंभीर जखमी केल्याची माहिती आहे.

____________________

वनविभाग अक्शनमोडवर

वाघाच्या बंदोबस्तासाठी ११ ट्रप कॅमेरे व ४६ वन अधिकारी व कर्मचारी २४ तास गस्त घालत आहेत.सोबतच जंगलव्याप्त गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आले आहे.

————————————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here