नगरपंचायत निवडणुकीची चाहूल  विकासकामांवरच जनता नाखुश तर कौल कुणाला देणार?

0
720

नगरपंचायत निवडणुकीची चाहूल

विकासकामांवरच जनता नाखुश तर कौल कुणाला देणार?

कोणते असतिल प्रचाराचे मुद्दे

महाविकास आघाडी होणार का महाबिघाडी

रुपेश मंकिवार

पोंभुर्णा प्रतिनिधी :- पोंभुर्णा नगरपंचायत निवडणुकीची चाहूल लागली आहे . त्यामुळे साहजिकच आता हौशे , नवशे , गौशे सरसावले आहेत . मावळलेल्या नगर पंचायतमध्ये भाजपाची सत्ता होती . आता उगवत्या नगरपंचायतीवर कोणाचा झेंडा असेल हा प्रश्न येत्या २१ तारखेला होणारी निवडणूक ठरवेल . निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणी किती विकास केला याचीच चर्चा आता रंगू लागली आहे . जनता चारही बाजूने हैराण आहे . कोरोना संकट समयी नगरसेवकांच्या सामाजिक मदत कार्याची जोरदार चर्चा व झालेल्या विकासकामांवर जनतेमधून सवाल उपस्थित केले जात आहेत . या सर्वांचा लेखाजोखा यावेळी निवडणुकीत होणार , कोरोना संकटात कोण किती मदतीला आले ? मग ते कुठल्याही पक्षाचे असोत , त्यांना जनता जाब हा विचारणारच नगरसेवक हा तत्परतेने वॉर्डातील समस्या सोडविणारा हवा , असे लोकांचे म्हणणे आहे . सध्या भाजपाकडून पोंभुर्णा शहराचा विकास झाल्याचा गवगवा केला जातो आहे.यासाठी घरोघरी जाऊन ते पटवून दिले जात आहे.या विकासाच्या भरोषावर आपण येणारी नगरपंचायत सर करणार असल्याचे भाजप कार्यकर्त्यांना वाटत आहे.तर दुसरीकडे त्यांनी केलेल्या विकासकामांचा पाढा ते वाचत आहे मोठमोठ्या इमारती,बागबगीचे, रस्ते, नाट्य गृह , बनवुन आम्ही विकासाचे शिलेदार आहोत हे भाजपा चे कार्यकर्ते सांगत आहेत.

भाजपा चे तत्कालीन तालुका अध्यक्ष गजानन गोरंटिवार यांचे नुकतेच निधन झाले.भाजपा संघटतनेत त्यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांच्या निधनाने भाजपा संघटनेचे नुकसान झाले असुन याचा फटका भाजपा ला बसणार आहे यात काही शंका नाही.

हे असतील प्रचाराचे मुद्दे

पिण्याचे पाणी , दैनंदिन स्वच्छता , खड्डे विरहित रस्ते , दिवाबत्ती , सांडपाणी निचरा व्यवस्था या महत्त्वाच्या गरजा वाटतात , परंतु झालेल्या विकासकामांची सध्या अवस्था काय ? विकासकामानंतरची देखभाल दुरुस्ती दुर्लक्षित होते . बसस्थानकाचा प्रश्न , नवीन शासकीय इमारतीमधील तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या होणाऱ्या दुरवस्थेला कोण जबाबदार ? फार मोठा निधी नगरपंचायतीने स्वच्छता मोहिमेवर खर्च केला आहे . शेडचे बांधकाम , समाजमंदिरे , क्रीडा संकुल अनेक छोटी – मोठी कामे करण्यावर भर देण्यात आला आहे . पण रोजगार व शेतकऱ्यांना मात्र या विकासकांमामधुन वगळण्यात आले त्यामुळे हा विकासकामांचा आम्हाला काय फायदा असे बेरोजगार व शेतकरी बोलत आहे.पोंभुर्णा शहरात शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे हे विशेष.

महा विकास आघाडी की महा विकासबिघाडी ?

पोंभुर्णा मध्ये शिवसेना , राष्ट्रवादी , काँग्रेस, भाजपा व वंचित हे पक्ष रिंगणात आहेत . महाराष्ट्रात शिवसेना , राष्ट्रवादी व काँग्रेसची महाआघाडीची सत्ता आहे . तरी पोंभुर्णा नगरपंचायत निवडणुकीत महाआघाडी होणार की महाबिघाडी यावर सर्वांचे लक्ष लागले आहेत . मागील महिन्यात काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळु धानोरकर येऊन गेले . त्यांनी कांग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. काँग्रेसचे स्थानिक नेते ओमेश्वर पद्मगीरीवार हे  सध्याच्या तालुका अध्यक्ष कवडु कुंदावार यांच्यावर नाराज असल्याचे चित्र दिसत आहे कांग्रेस ने निवडणुकीची धुरा राजकारणात नवख्या असलेल्या युवकांच्या हाती दिली आहे.तर ओमेश्वर पद्मगीरीवार हे युवा क्रांती संघटनेच्या माध्यमातून युवकांना एकत्र करुन “हम किसीसे कम नहीं” म्हणून दाखवुन दिले जर ओमेश्वर पद्मगीरीवार हे स्वतंत्र लढले तर याचा फटका कांग्रेस ला बसु शकतो , सेनेचे स्थानिक नेते आशिष कावटवार, गणेश वासलवार,हे स्वबळावर लढणार असल्याचे सांगत आहेत मागील निवडणुकीत गटबाजीने शिवसेनेला खाते हि खोलता आले नाही पण आता परिस्थिती बदलली आहे अनेक वार्डात शिवसेनेचे जोर आहे जर गटबाजीला बाहेर ठेऊन निवडणूक लढली तर हि निवडणूक शिवसेनेसाठी सोपी होईल. राष्ट्रवादीचे नेते विजय ढोंगे हे मागील सात वर्षांपासून तालुका अध्यक्ष आहेत पण् राष्ट्रवादी काँग्रेस ची सत्तेत घरवापसी होताच राष्ट्रवादी मध्ये मेगा भरती झाली यात विजय ढोंगे यांना बाजुला ठेऊन निवडणूक लढवणार असे नवनियुक्त कार्यकर्ते सांगत आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी होणार का ?  हे नेते कोणता निर्णय घेणार ? हा येणारा काळ ठरवणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here