जागतिक पर्यावरण दीनानिमित्त नमस्ते चांदा फाउंडेशनतर्फे वर्धा नदी पात्राची साफ सफाई!

0
443

जागतिक पर्यावरण दीनानिमित्त नमस्ते चांदा फाउंडेशनतर्फे वर्धा नदी पात्राची साफ सफाई!

चंद्रपूर : सध्या आपल्या अवतीभवती भरपूर प्रमाणात प्रदूषण होत आहे. नियमित प्रदूषण दूर करण्याकरिता आपण सर्वानी शासनावर अवलंबुन न राहता स्वतः स्वच्छता मोहीम राबवावी. त्याकरिता नमस्ते चांदा फाउंडेशन तर्फे नियमित कार्यक्रम करण्यात येत असतात. आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्याने हडस्ती गावातील  वर्धा नदीपात्रात स्वच्छता अभियानाची मोहीम नमस्तेचांदा फाउंडेशनतर्फे घेण्यात आली. यावेळी नमस्तेचांदा फाउंडेशनमधील युवकांनी भरपूर प्रमाणात प्लास्टिक व इतर कचरा गोळा केला.

चंद्रपूर येथील युवक मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन विविध समाजोपयोगी कार्य करत असतात. समाजासाठी आपण काही देणं लागत हि जाणीव या युवकांनी बाळगली आहे. आज नदी पात्रात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व इतर टाकाऊ वस्तू टाकण्यात येते. त्यामुळे नदीपात्रात घाणीचे साम्राज्य झाल्याचे चित्र पाहावयास मिळते. प्लास्टीक मुक्त नद्या व्हावेत हे एक प्रण आपण सर्वानी घ्यावे व याच पद्धतीने पुढे येऊन आपल्या परिसराची स्वच्छता करण्याचे आवाहन या युवकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here