चिमूर तालुका पुरोगामी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद राऊत यांची निवड

0
243

चिमूर तालुका पुरोगामी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद राऊत यांची निवड

शासनमान्य पुरोगामी पत्रकार संघाची कार्यकारणी गठीत

चिमूर तालुका पुरोगामी पत्रकार संघटना नुकतीच राज्याध्यक्ष वसंत मुंडे, शासनमान्य पुरोगामी पत्रकार संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी, राज्य सचिव प्रविण परमार, राज्य संघटक शरद मराठे, राज्य निवड समिती, राज्य कोअर कमिटी व पूर्व विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर, यांच्या आदेशानुसार तथा जिल्हा संपर्क प्रमुख सुजय वाघमारे, प्रभारी निलेश ठाकरे, व जिल्हा अध्यक्ष रुपेश निमसरकार यांच्या सुचने नुसार शासनमान्य असलेल्या पुरोगामी पत्रकार संघाच्या चिमूर तालुका अध्यक्ष पदावर प्रमोद राऊत यांची सर्वांच्या मताने निवड करण्यात आली. पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद राऊत हे चिमूर तालुक्यात संघटन वाढीसाठी निश्चितच आपले अमूल्य योगदान देणार असून, पत्रकार संघटनेच्या असणाऱ्या अडीअडचणी सोडवून पत्रकारितेला योग्य न्याय देतील असा विश्वास संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी दर्शवून त्यांची शासनमान्य पुरोगामी पत्रकार संघाच्या चिमूर तालुका अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. तसेच पुरोगामी पत्रकार संघाचे चिमूर तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वात खालील कार्यकारणी घोषित करण्यात आली. यामध्ये पुरोगामी पत्रकार संघाच्या चिमूर तालुका सचिव पदावर नितीन पाटील, कार्याध्यक्ष संजय नागदेवते, तालुका उपाध्यक्ष गणेश येरमे, तालुका सहसचिव शुभम बारसागडे, तालुका संघटक आतिश चट्टे, कोषाध्यक्ष विकास खोब्रागडे, तालुका संपर्क प्रमुख म्हणून गजानन उमरे तर सदस्यपदी आशिष गजभिये, प्रशांत मेश्राम यांची नियुक्ती केली असून, सर्व कार्यकारणीचे राज्य निवड समिती, राज्य कोअर कमिटी आणि पूर्व विदर्भ अध्यक्ष नरेन्द्र सोनारकर, जिल्हा अध्यक्ष रुपेश निमसरकार, जिल्हा संपर्क प्रमुख विजय वाघमारे, यांनी सर्वांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here