चिमूर तालुक्यातील बीजेपी व कॉंग्रेस चे कार्यकर्ते आम आदमी पार्टी मध्ये सामील

0
445

चिमूर तालुक्यातील बीजेपी व कॉंग्रेस चे कार्यकर्ते आम आदमी पार्टी मध्ये सामील

 

चिमूर विधानसभेत आम आदमी पार्टी तर्फे प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात कोरोना काळातही अविरतपणे चालू असलेल्या जनसेवेच्या अभिनव उपक्रमांनी प्रेरित होऊन चिमूर तालुक्यातील बारा बीजेपी व कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने आम आदमी पार्टीत प्रवेश घेतला.

भ्रष्टाचार मुक्त राजकीय व्यवस्था, रोजगार, आरोग्य, शिक्षण व सुरक्षा या मुद्द्यांवर आम आदमी पार्टी भारतभर काम करत असून दिल्ली येथील आप सरकारने यशस्वी केलेले अनेक मॉडल आज जगभर चर्चिले जात आहेत, यात प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य व सुरक्षा व्यवस्थेतील मुख्य बदल तसेच दोनशे युनिट पर्यंत मोफत वीजबिल, मोफत पाणी पुरवठा या आदर्श मानल्या जातात. कोरोना वर मात करण्यासाठी दिल्ली आप सरकार तर्फे चालू केलेला ‘ऑक्सिमीटर’ द्वारे ऑक्सिजन लेवेल तपासणी करण्याचा उपक्रम तर अमेरिकेसह भारतातील अनेक राज्यात राबविला जात आहे.

कोरोना काळात अनेक जन बेरोजगार झालेत, नोकऱ्या गेल्यात, आर्थिकदृष्ट्या कमजोर झालेत, तसेच व्यापार पूर्णपणे ठप्प झालेला असतांना चिमूर विधानसभेत प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात ‘मागेल त्याला उद्योग’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा फायदा शेकडो युवक-युवती, शेतकरी घेत असून नवनवीन उद्योगासाठी प्रेरित होत आहेत. याच चळवळीतून चिमूर विधानसभेत मशरूम क्लस्टर उभारण्यात येत आहे. ‘ऑक्सिमित्र’ या अभियानाद्वारे घरोघरी जाऊन आप चे स्वयंसेवक जनसामान्यांचे ऑक्सिजन लेवेल मोफत तपासून त्यांना कोरोनाबद्द्ल मार्गदर्शन करीत आहेत. अश्या प्रकारच्या प्रामाणिक जनसेवेच्या कार्याने प्रभावित होऊन जनमानसामध्ये आम आदमी पार्टी बद्दल आपुलकी तयार झालेली आहे. याच कार्याने प्रभावित होऊन कैलास भोयर, संजय वरघने, राजीव साटोणे, सुधाकर भलमे, सुखदेव तिजारे, आर जी वरघने, गजानन गोहणे, सौ. वृंदा वरघने, संजय डफ, अरविंद नेउलकर, दिवाकर पुंड, गजानन गोठे यांनी आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश घेतला.

याप्रसंगी विशाल इंदोरकर, आदित्य पिसे, मंगेश शेंडे, संजय बहादुरे, सुशांत इंदोरकर, विशाल बारस्कर व इतर आप चे पदाधिकारी तसेच स्वयंसेवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here