सांगोडा येथे सिमेंट काँक्रेट रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

0
349

आवाळपुर: कोरपना तालुक्यातील सांगोडा येथील ग्रामपंचायत च्या माध्यमातून आज ग्रामपंचायत सांगोडाचे सरपंच श्री. सचिनजी बोंडे यांच्या हस्ते सोशल डिस्टंसिंग चे पालन करून जनसुविधा जिल्हा निधी अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोड चे भूमीपूजन करण्यात आले.
ग्रामपंचायत च्या माध्यमातून मागील काही वर्षात गावचा विकास हा झपाट्याने झालेला असून, यापुढेही गावाच्या विकासाठी नेहमी कटीबदद्ध असल्याची प्रतिक्रिया सरपंच सचिनजी बोंडे दिली.या उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी उपसरपंच श्री विजयजी लांडे, सचिव श्री. एस. पी. कुरुडे, ग्रा. प. सदस्या सौ. विजयमाला ताई पिपळकर, ग्रा. प. सदस्या सौ. मनीषाताई काळे, ग्रा.प.सदस्या विद्याताई पिपळकर, ग्रा.प. सदस्या सौ रमाबाई धोटे, व ग्रामस्थ उपस्थित होते.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here